• Download App
    दक्षिणेतले समुद्रतरण, केरळच्या कॉलेजमधले पुशअप्स काँग्रेसची political immunity वाढवतील की... Kerala assembly elections 2021 results analysis

    Kerala assembly elections 2021 results analysis : दक्षिणेतले समुद्रतरण, केरळच्या कॉलेजमधले पुशअप्स काँग्रेसची political immunity वाढवतील की…

    विनायक ढेरे

    तिरूअनंतपूरम – एवढा प्रचाराचा धडाका उडविला… केरळ, तामिळनाडूतल्या मच्छिमारांबरोबर समुद्रतरण केले… केरळमधल्या कॉलेजच्या पोरीशी पुशअप्सची स्पर्धा केली… पण या सगळ्याचा काँग्रेसची political immunity वाढविण्यासाठी लाभ होईल की… हे सगळे workout चे मुसळ केरात जाईल… हे अवघ्या काही तासांमध्ये ठरणार आहे. Kerala assembly elections 2021 results analysis

    • काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल गांधी यांची केरळमधली परीक्षा त्यांच्या तथाकथित राष्ट्रीय नेतृत्वाबद्दल काँग्रेस अंतर्गत त्यांच्या गोटात जरी चर्चेचा विषय होणार नसली, तरी जी – २३ नेते आणि काँग्रेसबाह्य शक्तींमध्ये ते मोठ्या चर्चेचा विषय ठरणार आहे…
    • सगळे एक्झिट पोल धुडकावून केरळमध्ये काँग्रेसने बाजी मारली, तर जी – २३ नेत्यांच्या तोंडाला बूच बसून राहुल गांधींचे नेतृत्व मुकाटपणे मान्य करण्याखेरीज त्यांच्यापुढे पर्याय उरणार नाही.
    • त्याच वेळी सगळे रणनीतीकार, पोलस्टार्स यांचे राजकीय भाकितांचे ज्ञान किती तकलादू आहे, हे सिद्ध होऊन राहुल गांधींचे नेतृत्व त्यांच्या पप्पू प्रतिमेच्या पलिकडे जाऊन स्थिर होईल…
    • अर्थात हे सगळे जर – तरच्या भाषेतच किमान आज सकाळी १०.०० वाजेपर्यंत बोलावे लागेल. मतदानयंत्रांची कुलूपे उघडून त्यातील मतांच्या बेरजा वाढायला लागल्या की काँग्रेसमध्ये राहुलजींच्या नेतृत्त्वाचा मीटर खाली जातोय की वर हे समजायला लागेल.
    • अर्थात हा काँग्रेस पक्ष आहे… असल्या किती निवडणूका आल्या आणि गेल्या… किती पोलस्टार्स आले आणि गेले… गांधी परिवाराची काँग्रेसमधली political value पी. व्ही. नरसिंह राव वगळता कोणी तस्स की मस्स करू शकलेले नाही, हे राजकीय विश्लेषकांनी विसरता कामा नये.
    • याचा अर्थ काँग्रेसवाले राजकीय विश्लेषकांचे ऐकत नाहीत असे नाही… ते ऐकतात… पण त्यांच्या कथित सूचनांची ते अंमलबजावणी ते कधीच करीत नाहीत किंवा करू शकत नाहीत. कारण गांधी परिवाराच्या तोडीचा… करिष्म्याच्या बाबतीत त्याच्या जवळपास जाऊ शकेल असा नेता काँग्रेसला अद्याप शोधता आलेला नाही.
    • जी – २३ नेत्यांची ही क्षमता नाही. त्यांची काँग्रेसविषयक तळमळ, त्यांची विद्वत्ता, संसदीय राजकारणातील अनुभव आणि क्षमता या गोष्टी जमेस धरूनही ते ५ राज्यांच्या विधानसभा निवडणूकीनंतर देखील गांधी परिवारातील नेतृत्वाला प्रबळ आव्हान उभे करून काँग्रेसला पर्यायी नेतृत्व देण्याची शक्यता आणि क्षमता फार कमी आहे.
    • त्यामुळे दक्षिणतले समुद्रतरण आणि केरळमधले पुशअप्स हे काँग्रेसची political immunity वाढवोत की घटवोत… गांधी परिवाराची political immunity बरकरार राहण्याचीच शक्यता अधिक आहे… मग काँग्रेसबाहेर त्याच्याबद्दलच्या चर्चेची राळ कितीही उडविली तरी…!!

    Kerala assembly elections 2021 results analysis

    महत्वाच्या  बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य