• Download App
    अमेरिकेच्या उपाध्यक्षा कमला हॅरीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन करून दिली गुड न्यूज|Kamala Harris called Prime Minister Narendra Modi and gave him good news

    अमेरिकेच्या उपाध्यक्षा कमला हॅरीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन करून दिली गुड न्यूज

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वत: फोन करून अमेरिकेच्या उपाध्यक्षा कमला हॅरीस यांनी गुड न्यूज दिली आहे. भारताला कोरोना प्रतिबंधक लस पुरविण्यासाठी अमेरिको तयार आहे असे कमला हॅरीस यांनी सांगितले आहे. US Vice President Kamala Harris called Prime Minister Narendra Modi and gave him good news

    भारतीय वंशाच्या अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवरून चर्चा केली. पतंप्रधान मोदी यांनी ट्वीट करून यासंदर्भात माहिती दिली आहे.



    जागतिक पातळीवर लसींच्या पुरवठ्याबाबत अमेरिकेच्या रणनीतीचा भाग म्हणून भारताला लसींचा पुरवठा करण्याच्या आश्वासन कौतुकास्पद आहे. भारत- अमेरिकेत लसींच्या मुद्द्यावर सहकार्य आणखी बळकट करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांवरही आम्ही चर्चा केली,असे मोदी यांनी सांगितले.

    जागतिक पातळीवरील स्थिती सामन्य झाल्यानंतर अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरीस यांना पंतप्रधान मोदींनी भारत भेटीचं निमंत्रण दिलं. दोन्ही नेत्यांनी लस निर्मिती क्षेत्रात अमेरिका आणि भारतासह इतर देशांना आरोग्यसंबंधीच्या पुरवठ्याची साखळी बळकट करण्यासाठीच्या प्रयत्नांवर चर्चा केली.

    क्वाड स्तरावरी भारत-अमेरिकेतील भागिदारीसह साथीच्या आजारावरील दीर्घकालीन आरोग्यावर होणाºया दुष्परिणामांवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी लस उपक्रमावर प्रकाश टाकला, अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आली.

    पंतप्रधान मोदींनी ट्विटरद्वारे माहिती देताना सांगितले की, काही वेळापूर्वीच कमला हॅरिस यांच्याशी चर्चा झाली. जगभरात लसींचा पुरवठा करण्याच्या अमेरिकेच्या रणनितीचा एक भाग म्हणून लस पुरवण्याच्या आश्वासनाचं मी कौतुक केलं.

    याशिवाय अमेरिकन सरकार, व्यावसायिक, उद्योजक आणि प्रवासी भारतीयांना मिळालेल्या समर्थनासाठी मी त्यांचे आभार मानले. लसीबाबत भारत आणि अमेरिकेदरम्यान सुरू असलेल्या सहकार्याबद्दलही चर्चा झाली.

    काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी जून महिन्याच्या अखेरपर्यंत ८ कोटी कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या डोसचा पुरवठा केला जाणार असल्याचे म्हटले होते. यामध्ये सुरूवातीच्या टप्प्यात २.५ कोटी डोसचा पुरवठा केला जाणार आहे.

    यामध्ये ७५ टक्के म्हणजेच १.९ कोटी कोवॅक्स अंतर्गत दुसऱ्या देशांना पाठवले जातील. तर उर्वरित ६० लाख जोस अशा देशांना पाठवले जातील ज्या ठिकाणी कोरोनाबाधितांची संख्या झपाट्यानं वाढत आहे

    काही दिवसांपूर्वी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर अमेरिकेच्या दौऱ्या वर गेले होते. करोना व्हायरससंबंधी मुद्द्यावर दोन्ही देशांमधील सहकायार्चा मार्ग मोकळा होईल, असे त्यांनी सांगितले.

    करोना संकटात भारताला मदत करण्यासाठी अमेरिकेकडून पुढेही प्रयत्न केले जातील, असं अमेरिकेच्या प्रतिनिधींकडून सांगण्यात आलं. अमेरिकेने आतापर्यंत भारताला ५०० कोटी डॉलरची मदत करण्यात आली आहे.

    Kamala Harris called Prime Minister Narendra Modi and gave him good news

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो

    PM SVANidhi : PM स्वनिधी योजनेची मुदत 31 मार्च 2030 पर्यंत वाढवली; कर्जाची रक्कमही ₹15,000 पर्यंत वाढली

    Supreme Court : केंद्राने म्हटले- राज्ये सुप्रीम कोर्टात रिट याचिका दाखल करू शकत नाहीत; राष्ट्रपती-राज्यपाल यांच्या निर्णयांसाठी न्यायालये जबाबदार नाही