वृत्तसंस्था
टोकियो : जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्या सभेत स्फोट झाला. पंतप्रधान भाषण देत होते त्याचवेळी स्मोक बॉम्बने हल्ला झाला. पंतप्रधानांना सुरक्षा कर्मचाऱ्यांनी सुखरूप बाहेर काढले आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून एका व्यक्तीला अटक केली आहे.Japanese Prime Minister Fumio Kishida was attacked with a smoke bomb, which exploded during a speech
द जपान टाईम्सच्या वृत्तानुसार, वाकायामा शहरात पंतप्रधान फुमियो किशिदा आपले भाषण सुरू करणार होते त्याआधीच हा स्फोट झाला. स्मोक बॉम्ब फेकल्यानंतर आजूबाजूला धुराचे लोट पसरले होते. घटनास्थळी जमलेले लोक सुरक्षितपणे बाहेर पडण्यासाठी धावताना दिसत असल्याचे या घटनेच्या व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. दरम्यान, सुरक्षा दलांनी एका व्यक्तीला पकडले.
सभेत झालेल्या स्फोटात पंतप्रधान किशिदा थोडक्यात बचावले आहेत. सत्ताधारी लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवाराच्या समर्थनार्थ ते भाषण करणार होते, असे सांगण्यात येत आहे.
जपानमधील पंतप्रधानांची सुरक्षा व्यवस्था भारताच्या पंतप्रधानांसारखी नाही. जपानमध्ये खूप कडक कायदे आहेत. तिथे परदेशी लोक फार कमी आहेत. सुरक्षित देशात सुरक्षेची गरज नसते, मात्र शिंजो आबे यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर पोलिसांनी त्याबाबत आढावा घेतला होता आणि याआधीही सुरक्षा व्यवस्था कडक ठेवण्यात आली होती, मात्र आता जपानी पोलिसांनी पुन्हा एकदा विद्यमान पंतप्रधानांच्या निदर्शनास आणून दिले आहे. स्फोटाबाबत सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घ्यावा लागेल कारण येत्या काळात हिरोशिमा शहरातही G7 ची तयारी सुरू आहे.
किशिदा 2021 मध्ये झाले पंतप्रधान
फुमियो किशिदा 2021 मध्ये जपानचे पंतप्रधान झाले. यासोबतच ते लिबरल डेमोक्रॅटिक पार्टीचे (एलडीपी) अध्यक्ष आहेत. त्यांनी 2012 ते 2017 पर्यंत परराष्ट्र मंत्री म्हणून काम केले आणि 2017 मध्ये त्यांनी कार्यवाहक संरक्षण मंत्री म्हणून काम केले. 2017 ते 2020 पर्यंत त्यांनी एलडीपी पॉलिसी रिसर्च कौन्सिलचे अध्यक्षपद भूषवले. नुकतेच किशिदा भारतात आले होते, तिथे त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.
शिंजो आबे यांच्या भाषणादरम्यान त्यांच्यावर प्राणघातक हल्ला
जपानमध्ये दुसऱ्यांदा मोठ्या राजकारण्याच्या सुरक्षेचा भंग झाला आहे. यापूर्वी माजी पंतप्रधान शिंजो आबे (67) यांची गेल्या वर्षी 8 जुलै रोजी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. भाषणादरम्यान शिंजो आबे यांच्यावरही हल्ला करण्यात आला. नारा शहरात ते भाषण देत असताना त्याचवेळी त्यांच्यावर गोळीबार झाला आणि ते अचानक खाली कोसळले. त्यानंतर त्यांना रुग्णालयात आणले असता त्यांचा मृत्यू झाला होता.
Japanese Prime Minister Fumio Kishida was attacked with a smoke bomb, which exploded during a speech
महत्वाच्या बातम्या
- Amarnath Yatra 2023 : अमरनाथ यात्रेला १ जुलैपासून प्रारंभ; १७ एप्रिलपासून सुरू होणार नोंदणी
- गुजरातमध्ये आम आदमी पार्टीला मोठा धक्का, सुरतमधील ‘आप’चे सहा नगरसेवक भाजपमध्ये दाखल!
- भीषण अपघात; जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर खासगी बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
- ‘’२०२४च्या निवडणुकीत बंगालमध्ये भाजपा ३५ पेक्षा जास्त जागा जिंकेल, आणि …’’ अमित शाह यांचे विधान!