• Download App
    जपान, सिंगापूरचा पासपोर्ट सर्वात पॉवरफुल, भारताचा यादीत ९० वा क्रमांक; पाकिस्तान, उत्तर कोरियाचा मात्र अतिशय कमकुवत|Japan, Singapore's passport is the most powerful, India ranks 90th in the list; Pakistan, North Korea, however, is very weak

    World Most Powerful Passport 2021 : जपान, सिंगापूरचा पासपोर्ट सर्वात पॉवरफुल, भारताचा यादीत ९० वा क्रमांक; पाकिस्तान, उत्तर कोरियाचा मात्र अतिशय कमकुवत

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : जगातील सर्वात पॉवरफुल पासपोर्ट जपान आणि सिंगापूरचा आहे. पाकिस्तान आणि उत्तर कोरियाचा पासपोर्ट जगातील सर्वात कमकुवत आहेत.हेनले पासपोर्ट इंडेक्सने जगातील सर्व पासपोर्टला क्रमांक दिले आहेत. तसेच या देशांची यादी दरवर्षी जाहीर केली जाते.Japan, Singapore’s passport is the most powerful, India ranks 90th in the list; Pakistan, North Korea, however, is very weak

    कोरोनाच्या उद्रेकानंतर, अनेक देशांनी त्यांच्या व्हिसा आणि पासपोर्टमध्ये बदल केले. याचा परिणाम पासपोर्टवरही झाला आहे.जगातील सर्वात पॉवरफुल पासपोर्टची क्रमवारी जाहीर झाली आहे. यानुसार, जपान आणि सिंगापूरकडे सर्वात पॉवरफुल पासपोर्ट आहेत, तर पाकिस्तान आणि उत्तर कोरियाकडे सर्वात कमकुवत पासपोर्ट आहेत.



    भारत, बुर्किना फासो, ताजिकिस्तानसह ९० व्या स्थानावर आहे. हेनले अँड पार्टनर्सने जगातील पॉवरफुल देशाच्या पासपोर्टचे रँकिंग जाहीर केले आहे. यानुसार, या देशांचे पासपोर्टधारक व्हिसाशिवाय ५८ देशांमध्ये प्रवेश करू शकतात.

    हेनले पासपोर्ट इंडेक्सनुसार, जपान आणि सिंगापूरचा स्कोअर १९२ आहे आणि सर्वात वर आहेत. याचा अर्थ असा की या देशांचे पासपोर्टधारक जगातील १९२ देशांमध्ये व्हिसाशिवाय प्रवास करू शकतात. पाकिस्तान, इराक, येमेन, अफगाणिस्तान सारख्या देशांचे पासपोर्ट सर्वात कमी पॉवरफुल आहेत.

    पॉवरफुल पासपोर्ट असलेले देश

    •  जपान, सिंगापूर (स्कोअर – १९२)
    •  जर्मनी, दक्षिण कोरिया (स्कोअर – १९०)
    •  फिनलँड, इटली, लक्समबर्ग, स्पेन (स्कोअर – १८९)
    • ऑस्ट्रिया, डेन्मार्क (स्कोअर – १८८)
    •  फ्रान्स, आयर्लंड, नेदरलँड्स, पोर्तुगाल, स्वीडन (स्कोअर – १८७)
    • बेल्जियम, न्यूझीलंड, स्वित्झर्लंड (स्कोअर – १८६)
    • चेक प्रजासत्ताक, ग्रीस, माल्टा, नॉर्वे, युनायटेड किंगडम, युनायटेड स्टेट्स (स्कोअर – १८५)
    • ऑस्ट्रेलिया, कॅनडा (स्कोअर – १८४)
    • हंगेरी (स्कोअर – १८३)
    • लिथुआनिया, पोलंड, स्लोव्हाकिया (स्कोअर – १८२)

    Japan, Singapore’s passport is the most powerful, India ranks 90th in the list; Pakistan, North Korea, however, is very weak

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य