46 वर्षांनंतर प्रशासनाने हिंदूंना दिली मोठी भेट.
विशेष प्रतिनिधी
संभल : Sambhal उत्तर प्रदेशातील संभल येथील जामा मशिदीत सर्वेक्षणादरम्यान झालेल्या गोंधळानंतर आणखी एका घटनेने लोकांचे लक्ष वेधले आहे. येथे 46 वर्षे जुने बंद असलेले मंदिर उघडण्यात आले आहे. प्रशासनाच्या देखरेखीखाली ते उघडण्यात आले आहे. ते उघडले जात असताना येथे मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.Sambhal
पोलिसांनी नागरिकांना येथे शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. हे मंदिर संभलच्या दीपा सरायमध्ये आहे. गेल्या ४६ वर्षांपासून हे मंदिर बंद होते. प्रशासनाने ते खुलं केलं आहे. खबरदारीचा उपाय म्हणून परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिसांनी लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले.
उत्तर प्रदेशातील संभलमध्ये 46 वर्षांपासून बंद असलेले हनुमान आणि शिव मंदिर प्रशासनाने पुन्हा उघडले आहे. 24 नोव्हेंबर रोजी येथे हिंसाचार झाला होता. गेल्या तीन दशकांपासून हे मंदिर बंद होते. मंदिर परिसराचा दरवाजा उघडताच लोकांनी जय श्री राम आणि जय हनुमानाच्या घोषणा दिल्या.
Jai Shri Ram slogans echoed once again in Sambhal
महत्वाच्या बातम्या
- Maharashtra ministry formula : मंत्रिमंडळ विस्तारात भाजपचेच वर्चस्व??; हे तर महाराष्ट्राच्या जनमताच्या कौलाचे प्रतिबिंब!!
- Mahakumbh : पंतप्रधान मोदींच्या हस्ते महाकुंभासाठी कलशाची स्थापना; पीएम म्हणाले- गुलामगिरीच्या काळातही कुंभावरील श्रद्धा थांबली नाही
- Fadnavis governments : ठरलं! 15 डिसेंबरला फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार
- Supreme Court : गोवा काँग्रेसला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का!