विशेष प्रतिनिधी
पूरी : जगन्नाथाची भूमी असलेल्या पूरी शहरातील पाण्याची गुणवत्ता युरोप- अमेरिकेइतकीच चांगली झाली आहे. पुरीतील अडीच लाख लोकसंख्येला नळाने शुध्द पाणीपुरवठा होणार आहे. या पाण्याचे गुणवत्ता मानक आयएस १०५०० आहे. त्यामुळे आता पुरी शहरात पाणी फिल्टर करण्याची गरज राहणार नाही.Jagannath’s Bhumi Puri has the same clean water as Europe, USA, tap water supply to 2.5 lakh population
पुरी या शहराला मेट्रोचा दर्जा नाही. तरीही या शहराने पाणीपुरवठ्याबाबत ही कामगिरी केली आहे. जगन्नाथाची पवित्र भूमी असलेल्या पुरी शहरात मुख्यमंत्री नवीन पटनाईक ड्रिंक फ्रॉम टॅप मिशनचे उद्घाटन केले.
आयएस 10500 चे गुणवत्ता मानकचे पालन करणारा पाणीपुरवठा करण्याच्या पुढाकाराने शहरातील अडीच लाख लोकसंख्या आणि दरवर्षी पवित्र ठिकाणी भेट देणाऱ्या 2 कोटी पर्यटकांना याचा फायदा होईल. पिण्याचे पाणी साठवण्याची किंवा फिल्टर करण्याची आवश्यकता नाही. जगातील फक्त मोठ्या शहरांमध्ये अशा सुविधा आहेत.
पिण्याचे पाणी शुद्द असल्यामुळे पुरी शहरात दरवर्षी होणारा प्लॅस्टिकच्या बाटल्यांचा वापर रोखला जाणार आहे. त्यामुळे ४०० मेट्रिक टन प्लॅस्टिक कचरा कमी होणार आहे. पुरी शहरात आता १२० ठिकाणी सार्वजनिक नळकोंडाळी बसविली जाणार आहेत. त्यामुळे पुरीतील रहिवासी, पर्यटक आणि यात्रेकरू आता थेट नळाचे पाणी पिऊ शकणार आहेत.
राज्य सरकार तंत्रज्ञानाचा वापर करून रिअल टाईमवर पाण्याची गुणवत्ता नियंत्रित करणार आहे. त्याचबरोबर गळती, पाण्याची गुणवत्ता तपासणे, पुरवठा योग्य राहणे आणि इतर समस्यांचे निराकारण करण्यासाठी मोबाईल क्रू (जलदगती पथक) तयार करण्यात आले आहे.
बाटलीबंद पाण्याचा वापर करण्यापासून जनतेला रोखण्यासाठी एलसीडी स्क्रिनद्वारे सार्वजनिक ठिकाणी पाण्याची रिअल टाईम गुणवत्ता दाखविली जाणार आहे, असे राज्य सरकारतर्फे सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर जलसाथी म्हणून नियुक्त केलेल्या बचत-गटातील महिलांना मीटर वाचन, पाणीपुट्टी वसुली, भूजल गुणवत्तेच्या चाचण्या करणे ही कामे दिली जाणार आहेत.
Jagannath’s Bhumi Puri has the same clean water as Europe, USA, tap water supply to 2.5 lakh population
महत्त्वाच्या बातम्या
- महाराष्ट्रातील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारची ७०० कोटींची मदत जाहीर
- Good News : पुढच्या महिन्यापासून लहान मुलांसाठी देखील कोरोना लस उपलब्ध आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांची माहिती
- Maharashtra Flood : पूरग्रस्त भागांमध्ये राज्यपाल भगत सिंह कोश्यारींचा दौरा टीका मात्र आशिष शेलारांवर! काय म्हणाले शरद पवार ?
- कोविड काळात निराधार झालेल्या बालकांचा खोटा आकडा सादर केल्याबद्दल ममता सरकारला सुप्रीम कोर्टाची फटकार