वृत्तसंस्था
नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज त्यांच्या दिल्ली दौऱ्यात सर्वात महत्वाची भेट घेतली. 10 जनपथ येथे जाऊन त्यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याशी चर्चा केली. सर्व विरोधकांच्या एकजुटीवर भर देणारी ही चर्चा होती. या चर्चेविषयी ममता बॅनर्जी यांनी बाहेर आल्यावर अत्यंत सकारात्मक उत्तर दिले. It is essential for everyone to come together in order to defeat BJP…Alone, I am nothing – everyone will have to work together.
आपण राष्ट्रीय पातळीवर येऊन नेतृत्व करणार का या प्रश्नाचे थेट उत्तर देणे त्यांनी टाळले तरीही, मी रस्त्यावर उतरून लढाई करणारी कार्यकर्ती आहे. नेता नाही. सर्वांनी बलशाली भाजपविरुद्ध एकत्र येऊन लढा देण्याची गरज आहे. त्यासाठी मी पुढाकार घेतला आहे, असे उत्तर दिले ममता बॅनर्जी यांनी दिले.
यावेळी त्यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याशी झालेल्या चर्चेची माहिती दिली. त्या म्हणाल्या, की सोनिया गांधी यांनी मला दुपारच्या चहासाठी बोलवले होते. आमच्यात सर्व विरोधी पक्षांच्या एकजुटीविषयी चर्चा झाली. काँग्रेस सर्व प्रादेशिक पक्षांवर विश्वास ठेवते आहे. प्रादेशिक पक्षांनी देखील काँग्रेसवर विश्वास ठेवला पाहिजे_ असे मत ममता यांनी सोनिया गांधी यांची झालेल्या चर्चेनंतर व्यक्त केले. आमच्यातील चर्चेचा सकारात्मक परिणाम भविष्यकाळात दिसेल असेही त्या म्हणाल्या.
2024 च्या लोकसभा निवडणुकीत तुम्ही राष्ट्रीय पातळीवरील नेतृत्व करणार का?, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता त्या म्हणाल्या, की मी एकटी काहीही करू शकत नाही. यासाठी सगळ्या विरोधी पक्षांनी एकत्र आले पाहिजे. प्रबळ भाजपला टक्कर दिली पाहिजे. सर्वांनी एकत्र येऊन पर्यायी ताकद निर्माण केली तर हे शक्य आहे. मी नेता नाही. रस्त्यावर उतरून लढणारी कार्यकर्ती आहे. परंतु सर्व विरोधी पक्षांची एकजूट करण्याचे माझे ध्येय आहे. यासाठी मी प्रयत्न करते आहे. सोनिया गांधी यांनी देखील माझ्या प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. विरोधकांचे ऐक्य व्हावे असे त्यांनाही वाटते म्हणूनच भविष्यकाळात काही सकारात्मक गोष्टी घडतील अशी मला आशा वाटते, अशी पुस्ती ममतांनी जोडली.
It is essential for everyone to come together in order to defeat BJP…Alone, I am nothing – everyone will have to work together.
महत्त्वाच्या बातम्या
- केरळ होतोय वेगाने म्हातारा, २० टक्केंहून अधिक जनता ज्येष्ठ नागरिक
- उर्जामंत्र्यांच्या डिबेटनंतर गोवा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री एकमेंकांशी भिडले, राजकीय फायद्यासाठी आमच्या महान नेत्यांचा केलेला अपमान सहन केला जाणार नाही
- जगन्नाथाची भूमी पूरीमध्ये युरोप, अमेरिकेइतकेच शुध्द पाणी, अडीच लाख लोकसंख्येला नळाने शुध्द पाणीपुरवठा
- आप पंजाबमध्ये स्वबळावरच लढणार, कोणत्याही राजकीय पक्षाशी युती करणार नाही
- बी. एस. येडियुरप्पा यांच्या राजीनाम्यामुळे व्यथित होऊन समर्थकाची आत्महत्या