• Download App
    पॅलेस्टिनी हमास दहशतवादी संघटनेवर इस्राईलचा एअर स्ट्राइक!!; गाजा पट्टीत डझनभर विमाने घुसली|Israeli Air Strike on Palestinian Hamas Terror Organization!!; Dozens of planes entered the Gaza Strip

    पॅलेस्टिनी हमास दहशतवादी संघटनेवर इस्राईलचा एअर स्ट्राइक!!; गाजा पट्टीत डझनभर विमाने घुसली

    वृत्तसंस्था

    तेल अविव : पॅलेस्टनी दहशतवादी संघटना हमासच्या दहशतवाद्यांनी इस्राईल मधल्या तेल अविव आणि अश्कलो शहरावर रॉकेट हल्ला करताच तो हल्ला परतवताना इस्राईलच्या हवाई दलाने गाझापट्टीत एअर स्ट्राइक केला आहे.Israeli Air Strike on Palestinian Hamas Terror Organization!!; Dozens of planes entered the Gaza Strip

    इस्राईलच्या डझनभर लढाऊ विमानांनी एकाच वेळी गाजा पट्टीतल्या अनेक ठिकाणांवर शेकडो क्षेपणास्त्रे डागून हमास दहशतवादी संघटनेचे अड्डे उध्वस्त केले आहेत.



    पॅलेस्टिनी हमास दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यांनी आज सकाळीच काही रॉकेट्स डागली. त्यातली काही रॉकेट्स तेल अविव आणि अश्कलो मधल्या नागरी वस्त्यांवर पडली. त्यामुळे इस्राइलने ताबडतोब युद्धमान परिस्थिती जाहीर केली. इस्राईलचे हवाई दल आणि लष्कर सज्ज झाले आणि सुमारे एक डझन इस्रायली विमानांनी गाजा पट्टीत घुसून हमास दहशतवादी संघटनेच्या अड्ड्यांवर शेकडो क्षेपणास्त्रे डागली. त्यामुळे हमासचे प्रचंड मोठे नुकसान झाले.

    या नुकसानीचा आकडा इस्राईली हवाई दल नंतर जाहीर करणार आहे. या हवाई दलानेच डझनभर लढाऊ विमानांनी गाझापट्टीत हल्ला केल्याची माहिती देणारे ट्विट केले आहे. या हल्ल्याचे तपशील हवाई दल लवकरच जाहीर करणार आहे.

    Israeli Air Strike on Palestinian Hamas Terror Organization!!; Dozens of planes entered the Gaza Strip

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!