• Download App
    IPL २०२२ : RCB ने संजय बांगर यांची मुख्य प्रशिक्षक म्हणून केली नियुक्ती , नवीन हंगामाची तयारी सुरू ।IPL 2022: RCB appoints Sanjay Bangar as head coach, preparations for new season begin

    IPL २०२२ : RCB ने संजय बांगर यांची मुख्य प्रशिक्षक म्हणून केली नियुक्ती , नवीन हंगामाची तयारी सुरू

    माजी भारतीय क्रिकेटपटू संजय बांगर यांच्याकडे कोचिंगचा भरपूर अनुभव आहे, ते २०१४ पासून पाच वर्षे भारतीय क्रिकेट संघाचे फलंदाजी प्रशिक्षक आहेत IPL 2022: RCB appoints Sanjay Bangar as head coach, preparations for new season begin


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीग फ्रँचायझी रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने संजय बांगर यांची मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.बांगर यांना फेब्रुवारीमध्ये आरसीबीचा (RCB) फलंदाजी सल्लागार बनवण्यात आले होते, परंतु आता त्यांना संघाचे प्रमुख म्हणून बढती देण्यात आली आहे.

    ते माइक हेसन यांची जागा घेतील आणि त्यांचा कार्यकाळ दोन वर्षांचा असेल.हेसन यापुढेही संघाचे क्रिकेट ऑपरेशन्सचे संचालक असतील. आयपीएल २०२१च्या UAE लेगमध्ये त्यांच्याकडे प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली असली तरी ते आता एकच जबाबदारी पार पाडणार आहे.

    आरसीबीच्या अधिकृत ट्विटर हँडलद्वारे शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये माहिती देताना हेसन म्हणाले, “आम्ही आज संजय बांगर यांची पुढील दोन वर्षांसाठी आरसीबीचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.” हेसन यांनी बांगर यांचे कौतुक करताना सांगितले की, “संजयला खेळाडू आणि सपोर्ट स्टाफसोबत चांगले जमते आणि त्याला खेळाशी संबंधित चांगले ज्ञान आणि अनुभव आहे, जे संघाच्या हिताचे असेल.”

    माजी भारतीय क्रिकेटपटू संजय बांगर यांच्याकडे कोचिंगचा भरपूर अनुभव आहे, ते २०१४ पासून पाच वर्षे भारतीय क्रिकेट संघाचे फलंदाजी प्रशिक्षक आहेत आणि त्यांनी रवी शास्त्री यांच्या प्रशिक्षणाखाली संघाला वाढण्यास मदत केली आहे.२०१९ च्या विश्वचषकानंतर त्याच्या जागी विक्रम राठोर यांची निवड करण्यात आली.

    बांगर यांनी भारतासाठी १२ कसोटी, १५ एकदिवसीय सामने खेळले आहेत आणि तेव्हापासून ते वेगवेगळ्या संघांना प्रशिक्षण देत आहे.आता या वर्षाच्या अखेरीस आयपीएल २०२२ साठी मेगा लिलाव होणार आहे, तर विराट कोहलीने स्वतः संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याची घोषणा केली आहे, बांगर यांच्यासमोर सर्वात मोठे आव्हान नवीन खेळाडूंची निवड आणि समीकरण तयार करणे.

    IPL 2022: RCB appoints Sanjay Bangar as head coach, preparations for new season begin

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Dhan-Dhanya Krishi Yojana : केंद्राची पंतप्रधान धन-धान्य कृषी योजनेला मंजुरी; कमी कृषी उत्पादन असलेल्या 100 जिल्ह्यांवर लक्ष; 1.7 कोटी शेतकऱ्यांना फायदा

    RBI Governor : सरकार व्याजदरात आणखी कपात करू शकते; RBI गव्हर्नर म्हणाले- GDP डेटामध्ये मंदी असल्यास कमी केले जाऊ शकतात व्याजदर

    CDS Anil Chauhan : सीडीएस म्हणाले- कालच्या शस्त्रांनी तुम्ही आजचे युद्ध जिंकू शकत नाही; सुरक्षेसाठी गुंतवणूक गरजेची