Preparations : पेट्रोलमध्ये 100% इथेनॉल मिश्रणाच्या गाड्यांची तयारी; वाहन उत्सर्जन नियम बदलण्याचा प्रस्ताव
रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने केंद्रीय मोटार वाहन नियमांमध्ये बदलाचा मसुदा जारी केला आहे. यामध्ये ई८५ (८५ टक्के इथेनॉल आणि पेट्रोल) आणि ई १०० (जवळपास शुद्ध इथेनॉल) यांसारख्या इंधनांचा औपचारिक समावेश करण्याचा प्रस्ताव आहे. पेट्रोलमध्ये इथेनॉलचा वापर वाढवणे हा यामागचा उद्देश आहे. यामुळे आयात केल्या जाणाऱ्या तेलावरील देशाचे अवलंबित्व कमी होईल.