• Download App
    भारताचा गहू उत्कृष्ठ, अफगाणी जनतेकडून समाधान ; निकृष्ठ पुरवठा करणाऱ्या पाकिस्तानवर टीकास्त्र । India's wheat is excellent, satisfaction from the Afghan people; Criticism of Pakistan for poor supply

    भारताचा गहू उत्कृष्ठ, अफगाणी जनतेकडून समाधान ; निकृष्ठ पुरवठा करणाऱ्या पाकिस्तानवर टीकास्त्र

    वृत्तसंस्था

    काबुल : तालिबानच्या एका अधिकाऱ्याने भारताने पाठवलेल्या गव्हाच्या गुणवत्तेची प्रशंसा करताना निकृष्ट दर्जाचा गहू दान केल्याबद्दल पाकिस्तानची निंदा केल्याचे वृत्त समोर आले. त्यानंतर ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शब्दयुद्ध सुरू झाले आहे. India’s wheat is excellent, satisfaction from the Afghan people; Criticism of Pakistan for poor supply

    सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ फिरत आहे. ज्यामध्ये तालिबानचा अधिकारी पाकिस्तानी गव्हाच्या गुणवत्तेबद्दल तक्रार करताना दिसत आहे. “पाकिस्तानने दान केलेले गहू खाण्यायोग्य नाहीत.असे अफगाण पत्रकार अब्दुलहक ओमेरी यांनी ट्विट केले. त्यांनी तालिबान अधिकाऱ्याचा एक व्हिडिओ पोस्ट केला.



    अफगाण लोक “चांगल्या दर्जाच्या गव्हा” साठी ट्विटरवर भारताचे आभार मानत आहेत. “अफगाण जनतेला तुमच्या सततच्या पाठिंब्याबद्दल भारताचे आभार.-मैत्रीपूर्ण संबंध कायम राहतील. जय हिंद,” हमदुल्ला अरबाब यांनी ट्विट केले. नजीब फरहोदिस यांनी सांगितले की, “पाकिस्तानने अफगाणिस्तानला दिलेला गहू खराब झाला आहे.जो वापरता येत नाही. भारताने अफगाणिस्तानला नेहमीच मदत केली आहे.”

    India’s wheat is excellent, satisfaction from the Afghan people; Criticism of Pakistan for poor supply

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Rahul Gandhi राहुल गांधींकडून सावरकरांचा पुन्हा अपमान, कथित माफीनाम्यावरून नवे दावे!!

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका