ब्रह्मोस क्षेपणास्त्राला भारताच्या ब्रह्मपुत्रा नदी आणि रशियाच्या मॉस्क्वा नदीवरून नाव देण्यात आले आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशाच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी तिन्ही सैन्यदल सातत्याने ताकद वाढवत आहेत. दरम्यान, भारतीय नौदलाने ब्रह्मोस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे. नौदलाने बुधवारी बंगालच्या उपसागरात ब्रह्मोस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी झाली असून डागलेल्या क्षेपणास्त्राच्या सर्व चाचण्या पूर्ण झाल्याची माहिती भारतीय नौदलाने दिली आहे. Indian Navy successfully test-fired BrahMos missile in the Bay of Bengal
ब्रह्मोस क्षेपणास्त्राला भारताच्या ब्रह्मपुत्रा नदी आणि रशियाच्या मॉस्क्वा नदीवरून नाव देण्यात आले आहे. वास्तविक, ब्रह्मोस क्षेपणास्त्र भारत आणि रशियाचा संयुक्त उपक्रम आहे. या क्षेपणास्त्राची पल्ला 290 किमी आहे. जे मॅक 2.8 (ध्वनी वेगाच्या सुमारे तिप्पट) वेग असलेले जगातील सर्वात वेगवान क्रूझ क्षेपणास्त्र मानले जाते.
याआधी भारतीय वायुसेनेने बंगालच्या उपसागरात ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राच्या हवाई प्रक्षेपण आवृत्तीची यशस्वी चाचणी देखील केली होती. हवाई दलाने ऑक्टोबरमध्ये ही चाचणी घेतली होती. जे स्वदेशी शस्त्र प्रणालीच्या क्षेत्रातील एक मोठे यश मानले जात होते.
Indian Navy successfully test fired BrahMos missile in the Bay of Bengal
महत्वाच्या बातम्या
- मराठा आरक्षणासाठी सरकारचे प्रामाणिक प्रयत्न तरी सत्ताधारी आमदारांचे उपोषण का??; अजितदादांच्या कानपिचक्या!!
- कंत्राटी भरतीचा शासन निर्णय अखेर रद्द; महाविकास आघाडीने नेमलेल्या एजन्सीला महायुतीचा मोठा दणका!
- पीयूष गोयल यांच्या फोनवरही आले नोटिफिकेशन, ‘Apple’ला उत्तर द्यावे लागेल – राजीव चंद्रशेखर
- दहशतवादी हल्ल्यात हेडकॉन्स्टेबल शहीद, घरात घुसून गोळी झाडली; तीन दिवसांत हल्ल्याची तिसरी घटना