Indian Navy : 2 हजार किमी प्रवास करत ‘जिवंत क्षेपणास्त्र’ घेऊन भारतात पोहोचले तेलवाहू जहाज!; कोचीत भारतीय नौदलाची थरारक कारवाई
अरबी समुद्रात मोठ्या सागरी दुर्घटनेची शक्यता भारतीय नौदलाने वेळेवर हाणून पाडली आहे. संयुक्त अरब अमिरातीतील फुजैराहहून कोचीकडे येणाऱ्या एका तेलवाहू जहाजात जिवंत क्षेपणास्त्र अडकलेले असल्याचे समोर आल्यानंतर नौदलाने धाडसी मोहीम राबवत ते सुरक्षितपणे बाहेर काढले. तब्बल 2 हजार किलोमीटरचा प्रवास हे जहाज क्षेपणास्त्रासह करत भारतात पोहोचले होते.