विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – चीनबद्दल वाढलेल्या संशयाच्या पार्श्वभूमीवर कोरोना विषाणूचे उगमस्थान शोधण्याच्या आंतरराष्ट्रीय अध्ययनाला भारताने जाहीर पाठिंबा दिला आहे. चीनच्या वुहान शहरातून कोरोना जगभरात पसरला असून हा विषाणू नैसर्गिक नव्हे तर प्रयोगशाळेत तयार केला असल्याचाही आरोप होत आहे. विषाणूचा नेमका उगम कोठून झाला याची जागतिक आरोग्य संघटनेने चौकशी करावी, या मागणीनेही जोर धरला आहे. India warns china regarding corona spread
भारताने कोरोना उगमाच्या व्यापक चौकशीला खुला पाठिंबा देत सीमावादावरून कुरापती काढणाऱ्या चीनला सूचक इशाराही दिला आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी एका निवेदनातून आरोग्य संघटनेच्या अध्ययनाला भारताचा पाठिंबा जाहीर केला. मात्र, चीनचे थेट नाव घेण्याचे टाळले.
कोरोना विषाणूचे उत्पत्तीस्थान शोधण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या पुढाकाराने सुरू असलेले वैश्विक अध्ययन हे महत्त्वाचे पाऊल आहे. योग्य निष्कर्षाप्रत पोहोचण्यासाठी तसेच तपशील मिळविण्यासाठी आणखी अध्ययनाची आवश्यकता आहे.
अमेरिकेने दुसऱ्या टप्प्यातील चौकशीची मागणी केली. तर जागतिक आरोग्य संघटनेनेही यासाठी होकार दिल्याचे सांगितले जात आहे. दुसरीकडे याच मुद्द्यावर चीनला घेरण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी गुप्तहेर यंत्रणांना ९० दिवसांच्या आत अहवाल सादर करण्याचाही आदेश दिला आहे.
India warns china regarding corona spread
महत्त्वाच्या बातम्या
- केंद्राने नागरिकत्वासाठी अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांग्लादेशातील बिगर मुस्लिम निर्वासितांकडून अर्ज मागवले
- पंतप्रधानांना वाट पाहायला लावणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई, बंगालच्या मुख्य सचिवांना केंद्राने दिल्लीला परत बोलावले
- ठाण्यात रहिवासी इमारतीच्या स्लॅब कोसळून 6 ठार, ढिगाऱ्याखाली 4 ते 5 जण दबल्याची भीती
- काळ्या बुरशीवरील अम्फोटेरेसीन बी इंजेक्शन, वैद्यकीय साहित्याला आयजीएसटीमधून पूर्ण सूट, केंद्रीय अर्थंमत्री निर्मला सीतारामन यांनी जीएसटीवर घेतले हे निर्णय
- दोन मुख्यमंत्र्यांतील फरक , नवीन पटनाईक म्हणतात देश संकटात मदत नको, आम्ही आमच्या ताकदीवर लढतो अन् ममतांनी मागितले २० हजार कोटी रुपये