विशेष प्रतिनिधी
न्यूयॉर्क : संयुक्त राष्ट्र संघात चीनच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या सुरक्षा परिषदेच्या बैठकीवर भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी बहिष्कार घालत ड्रॅगनला सूचक इशारा दिला आहे. चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी हे यांनी या बैठकीचे नेतृत्व केले. India targets china in security council
मागील वर्षी चीनने लडाखमध्ये भारतीय हद्दीत घुसखोरी करताना जवानांवर हल्ला केला होता. यामुळे सीमावर्ती भागामध्ये अभूतपूर्व तणाव निर्माण झाला होता. व्हर्च्युअल पद्धतीने झालेल्या या परिषदेला १४ सदस्य देशांच्या मंत्रिस्तरीय अधिकाऱ्यांनी हजेरी लावली.
जागतिक पातळीवर या संकटाचा सामना करताना सर्वसमावेशक प्रयत्नांचा अभाव दिसून आला तसेच बहुस्तरीय व्यवस्थेची कमकुवत बाजू चव्हाट्यावर आली. लशींच्या वितरणामध्ये असमतोल पाहायला मिळाला. ’’ अशी खंत भारताने व्यक्त केली. या संकटाच्या काळामध्ये वैश्विअक सहानुभूती आणि बहुपक्षीय व्यवस्था अधिक बळकट करणे गरजेचे असल्याचेही भारताने स्पष्ट केले.
India targets china in security council
महत्त्वाच्या बातम्या
- जेनिफर, गौरी या सिहिणींना कोरोनाची बाधा, हैदराबादपाठोपाठ आता उत्तर प्रदेशातही लोण
- अशी ही पळवापळवी : महाराष्ट्रातील इतर जिल्हे उपाशी, आरोग्यमंत्री टोपेंचा जालना मात्र तुपाशी! लसीकरणातील भेदभावावरून केंद्राने मागितले स्पष्टीकरण
- सोनोवाल – बिस्वा शर्मा यांच्या राजकीय महत्वाकांक्षा शिगेला, आसाममध्ये राजकीय संघर्ष सुरु