• Download App
    दिल्लीत आता लशींचा खडखडाट, पुरेशा लस पुरवठ्याची केजरीवाल यांची केंद्राकडे मागणी Shortage of vaccines in Delhi

    दिल्लीत आता लशींचा खडखडाट, पुरेशा लस पुरवठ्याची केजरीवाल यांची केंद्राकडे मागणी

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली – राजधानी दिल्लीत कोरोना लशींच्या तुटवड्याचा प्रश्न समोर आला आहे. दिल्लीत १८ वर्षांपुढील दीड कोटी लोकांचे लसीकरण होणार आहे. त्यादृष्टीने राज्याला किमान तीन कोटी डोस आवश्यक आहेत. आतापर्यंत ४० लाख लसीचे डोस मिळाले आहेत. सध्या दररोज दीड लाख लोकांचे लसीकरण दिल्ली सरकार करत आहे. Shortage of vaccines in Delhi

    आगामी काळात दिल्लीतील सर्व प्रसारमाध्यमांच्या कार्यालयांमध्ये जाऊन तेथील कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्याची योजना राज्य सरकारने आखली आहे. मात्र केंद्राकडून पुरेशी लस मिळायला हवी असे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज स्पष्ट केले.

    सध्याच्या परिस्थितीत वेगवान लसीकरण हाच कोरोनाला रोखण्यासाठीचा उपाय आहे. त्यामुळे दिल्ली सरकारने यासाठी युद्धपातळीवर लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. केजरीवाल म्हणाले की राज्याकडे आगामी फक्त ५ ते ६ दिवस पुरेल इतकाच लसीचा साठा आहे.



     

    दिल्लीच्या शेजारच्या राज्यांमधील फरीदाबाद, सोनीपत , गाझियाबाद, नोएडा, ग्रेटर नोएडा या भागातील लोकही दिल्लीत येऊनच लसीकरण करून घेत आहेत. त्यामुळे राज्य सरकारला लसीची जास्त आवश्यकता आगामी काळात भासणार आहे. अठरा वर्षांच्या आतील मुलांना ही लसीकरण त्वरित सुरू करावे आणि त्यासाठी केंद्राने लवकरात लवकर दिल्लीला पुरवठा करावा, असे आवाहन त्यांनी केले. दिल्लीतील सरकारी शाळांमध्ये लसीकरण सुरू केले असून, सध्या किमान १०० शाळांमध्ये १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांना लसीकरणाचे काम सुरू आहे.

    Shortage of vaccines in Delhi

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    हेमंत सोरेन यांना पुन्हा धक्का! ED कोर्टाने फेटाळला अंतरिम जामीन

    उज्ज्वल निकमांना उमेदवारी; म्हणे, पूनम महाजनांचा पत्ता कट; पण हा तर खरा त्या पलीकडचा “मास्टर स्ट्रोक”!!

    ‘ममता बॅनर्जींना अटक करा, अन् ‘TMC’ला दहशतवादी संघटना घोषित करा’