वृत्तसंस्था
नवी दिल्ली : रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर युद्धाची खुमखुमी चीनला आली आहे. सीमांचे विस्तारवादी धोरण आणि कुरापती काढण्यात अग्रेसर असणाऱ्या चीनने पाकिस्तानात सुरु असलेल्या इस्लामिक परिषदेत काश्मीरचा मुद्दा उकरून काढला आहे. त्यावरून भारताने तुमचा याच्याशी काही एक संबध नसल्याचे सांगून फटकारले आहे. India lashes out at China over Kashmir; Pak-China plot to build third front of Islamic nations
जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. या उलट पाकिस्तानने काश्मीरचा भाग आणि चीनने अकसाई चीन हा भाग आपल्या ताब्यात ठेवला आहे. असे असताना इस्लामिक देशांच्या परिषदेत चीनने अकारण काश्मीर राग आळविला आहे.
रशिया युक्रेन युद्धात अमेरिका समर्थक राष्ट्र आणि रशिया समर्थक राष्ट्र असे दोन गट निर्माण झाले असताना पाकिस्तान, चीन हे देश जागतिक पातळीवर इस्लामिक राष्ट्रांना समवेत घेऊन तिसरी आघाडी स्थापन करण्याचा दिशेने पावले टाकत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. दरम्यान, केंद्र शासित जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असून त्यात चीनने लुडबुड करण्याची गरज नाही, असे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी ठणकावले आहे.
India lashes out at China over Kashmir; Pak-China plot to build third front of Islamic nations
महत्त्वाच्या बातम्या
- ED In Action : ईडी मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्याला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत, जाणून घ्या आता कोणती फाइल ओपन होणार
- दलीतांवरील अत्याचारांत वाढ, राजस्थान सरकार बरखास्त करून राष्ट्र्रपती राजवट लागू करण्याची मायावती यांची मागणी
- मोठी बातमी : भारताची ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी, सॉफ्टवेअरने वाढवली रेंज
- Farooq Khan Profile : 90च्या दशकात ठरले होते दहशतवाद्यांचा कर्दनकाळ, आता जम्मू-काश्मिरात भाजपचा चेहरा बनू शकतात माजी IPS फारुख खान