वृत्तसंस्था
नवी दिल्ली : भारतात कोरोना आणि ओमीक्रोन रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून १.९४ लाख नवीन प्रकरणे नोंदवली आहेत.
बुधवारी, १२ जानेवारी रोजी भारतात गेल्या २४ तासांत १९४,७२० नवीन कोविड प्रकरणे आढळली आहेत.६०.४०५ जण बरे झाले तर ४४२ जणांचा मृत्यू झाला आहे. Increasing number of corona, omicron patients in the country; 1.94 lakh new cases registered in 24 hours
बुधवारी एकूण नवीन कोरोना प्रकरणांची संख्या २६,६५७ (१५.८%) ने वाढली आहे. १२० जिल्ह्यात कोरोना पाय पसरत आहे. १० टक्के किंवा अधिक साप्ताहिक पॉझिटिव्ह रुग्ण आढळत आहेत.
महाराष्ट्रात ४८१ निवासी डॉक्टरांना कोरोना
महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्सचे अध्यक्ष डॉ. अविनाश दहिफळे यांनी वृत्तसंस्था एएनआयला माहिती दिली की महाराष्ट्रात आतापर्यंत किमान ४८१ निवासी डॉक्टरांना कोरोना झाला आहे.