• Download App
    उन्हाळ्याच्या सुट्ट्यांसाठी विशेष रेल्वे गाड्यांच्या कालावधीत वाढ; वाचा गाड्यांची यादी Increase in timing of special trains for summer vacations

    उन्हाळ्याच्या सुट्ट्यांसाठी विशेष रेल्वे गाड्यांच्या कालावधीत वाढ; वाचा गाड्यांची यादी

    प्रतिनिधी

    मुंबई : उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे प्रवाशांची जादा गर्दी लक्षात घेऊन रेल्वे विशेष गाड्या चालवत आहे. त्यांच्या कालावधीतही वाढ केली आहे. Increase in timing of special trains for summer vacations

    07198 दादर – काझीपेठ विशेष दिनांक २६.२.२०२३ पर्यंत चालविण्यासाठी अधिसूचित ट्रेन आता दि. २५.६.२०२३ पर्यंत चालविण्यासाठी वाढविण्यात आली आहे.

    07197 काझीपेठ – दादर विशेष दि. २५.२.२०२३ पर्यंत चालविण्यासाठी अधिसूचित ट्रेन आता दि. २४.६.२०२३ पर्यंत चालविण्यासाठी वाढविण्यात आली आहे.

    07196 दादर – काझीपेठ विशेष दि. २३.२.२०२३ पर्यंत चालविण्यासाठी अधिसूचित ट्रेन आता दि. २९.६.२०२३ पर्यंत चालविण्यासाठी वाढवण्यात आली आहे.

    07195 काझीपेठ – दादर विशेष दि. २२.२.२०२३ पर्यंत चालविण्यासाठी अधिसूचित ट्रेन आता २८.६.२०२३ पर्यंत चालविण्यासाठी वाढविण्यात आली आहे.

    07638 साईनगर शिर्डी– तिरुपती विशेष दि. २७.२.२०२३ पर्यंत चालविण्यासाठी अधिसूचित ट्रेन आता दि. २६.६.२०२३ पर्यंत चालविण्यासाठी वाढविण्यात आली आहे.

    07637 तिरुपती – साईनगर शिर्डी विशेष दि. २६.२.२०२३ पर्यंत चालविण्यासाठी अधिसूचित ट्रेन आता दि. २५.६.२०२३ पर्यंत चालविण्यासाठी वाढविण्यात आली आहे.

    07427 लोकमान्य टिळक टर्मिनस- नांदेड विशेष दि. २८.२.२०२३ पर्यंत चालविण्यासाठी अधिसूचित ट्रेन आता दि. २७.६.२०२३ पर्यंत चालविण्यासाठी वाढविण्यात आली आहे.

    07426 नांदेड – लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष दि. २७.२.२०२३ पर्यंत चालविण्यासाठी अधिसूचित ट्रेन आता दि. २६.६.२०२३ पर्यंत चालविण्यासाठी वाढविण्यात आली आहे.

    07429 लोकमान्य टिळक टर्मिनस- नांदेड विशेष दि. २३.२.२०२३ पर्यंत चालविण्यासाठी अधिसूचित ट्रेन आता दि २९.६.२०२३पर्यंत चालविण्यासाठी वाढविण्यात आली आहे.

    07428 नांदेड – लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष दि. २२.२.२०२३ पर्यंत चालविण्यासाठी अधिसूचित ट्रेन आता दि. २८.६.२०२३ पर्यंत चालविण्यासाठी वाढविण्यात आले आहे.

    वर नमूद केलेल्या गाड्यांच्या वेळा, संरचना आणि थांब्यांमध्ये कोणताही बदल केलेला नाही.

    आरक्षण : विशेष गाड्या क्रमांक 07196, 07198, 07638, 07427 आणि 07429 च्या विस्तारित फेऱ्यांसाठीचे विशेष शुल्कासह बुकिंग दि. २६.२.२०२३ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल.

    या विशेष ट्रेनच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा.

    प्रवाशांना स्वत:च्या आणि इतरांच्या सुरक्षिततेसाठी कोविड योग्य वर्तन पाळण्याचा सल्ला दिला जात आहे.

    Increase in timing of special trains for summer vacations

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    आम आदमी पार्टीच्या सोशल मीडिया हँडलरच्या डोक्यातून आली कॉकरोच जनता पार्टी; पण भ्रम आणि वास्तव!!

    Cockroach Janata Party : कॉकरोच जनता पार्टीचे 5 दिवसांत 60 लाख फॉलोअर्स; जाहीरनामा प्रसिद्ध- महिलांना 50% आरक्षण, CJI ना राज्यसभेवर पाठवणार नाही

    NEET Re-Exam : नीट फेर-परीक्षेपूर्वी बनावट टेलिग्राम चॅनेलवर कारवाई; शिक्षणमंत्री म्हणाले- त्वरित ब्लॉक करा; पेपरफुटी प्रकरणात 5 आरोपींना तुरुंगात पाठवले