वृत्तसंस्था
कोलकाता : पश्चिमेकडील राज्य पंजाबमध्ये काँग्रेसमध्ये उभी फूट पडत बंडाळी माजली आहे, तर दुसरीकडे पूर्वेकडील राज्य पश्चिम बंगालमध्ये भाजपमध्ये बंद करून बाबुल सुप्रियो तृणमूल काँग्रेसमध्ये सामील झाले आहेत.In the Congress in Punjab; While in Bengal the BJP revolted; Babul Supriyo joins Trinamool Congress
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाच्या वेळी बाबुल सुप्रियो यांना मंत्रिमंडळातून वगळले होते. त्यानंतर ते भाजपमध्ये अस्वस्थ असल्याचे बोलले जात होते. आज त्यांनी ममता बॅनर्जी यांचे भाचे खासदार अभिषेक बॅनर्जी आणि खासदार डेरेक ओब्रायन यांच्या उपस्थितीत तृणमूल काँग्रेस मध्ये प्रवेश केला.
2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी बाबुल सुप्रियो यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. पश्चिम बंगाल मधून लोकसभेवर निवडून आल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी बाबुल सुप्रियो यांना केंद्रात राज्यमंत्री पद दिले होते. त्यांना 2021 च्या विधानसभा निवडणुकीत तिकीट देऊन भाजपने मैदानात उतरवले होते.
परंतु त्यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला होता. त्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळातून देखील त्यांना वगळण्यात आले होते. त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा होती. ही चर्चा खरी ठरून बाबुल सुप्रियो यांनी आज पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस मध्ये प्रवेश केला आहे.
In the Congress in Punjab; While in Bengal the BJP revolted; Babul Supriyo joins Trinamool Congress
महत्त्वाच्या बातम्या
- किरीट सोमय्या यांच्या मनी लॉण्डरिंग आरोपांनंतर हसन मुश्रीफांची प्रकृती बिघडली, मुंबईत उपचार सुरू
- तालिबानी कारभार ; सत्तेत येताच दाखवले खरे रंग, महिलांच्या मंत्रालयात महिलांनाच बंदी
- WATCH : वाघ, बिबट्या कातडीची पुणे जिल्ह्यात तस्करी वाघ आणि बिबट्याचे जगणे शिकाऱ्यामुळे अवघड
- गुजरातेत भाजपने मुख्यमंत्र्यांसकट अख्खे मंत्रिमंडळ बिनबोभाट बदलले; पंजाबमध्ये काँग्रेस श्रेष्ठी बंडाळीच्या रस्त्यावर घसरले…!!