• Download App
    पंजाबमध्ये कॉँग्रेसला पराभवाचा धक्का बसणार, आप मारणार विधानसभा निवडणुकीत बाजी|In Punjab, Congress will be defeated, Aap will win the Assembly elections

    पंजाबमध्ये कॉँग्रेसला पराभवाचा धक्का बसणार, आप मारणार विधानसभा निवडणुकीत बाजी

    विशेष प्रतिनिधी

    चंदिगड: पंजाबमधील पक्षातील कलह आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला भोवण्याची शक्यता आहे. कॉँग्रेस पराभवाच्या उंबरठ्यावर असून आम आदमी पक्ष (आप) बाजी मारण्याची शक्यता एबीपी-सी वोटरने केलेल्या सर्व्हेत व्यक्त करण्यात आली आहे.In Punjab, Congress will be defeated, Aap will win the Assembly elections

    सर्व्हेत सहभागी झालेल्यापैकी २१ टक्के नागरिकांनी अरविंद केजरीवाल यांना पसंती दिली आहे. १६ टक्के सुखबीर सिंग बादल, ७ टक्के कॅप्टन अमरिंदर सिंग, भगवंत मान १४ टक्के, नवज्योत सिंग सिद्धूंना ५ टक्के आणि चरणजीत सिंग चन्नी यांना ३१ टक्के नागरिकांनी पसंती दिली आहे. इतरांना ६ टक्के नागरिकांनी पसंती आहे. आम आदमी पाटीर्ने मुख्यमंत्रीपदासाठीच्या चेहºयाची घोषणा करावी असे मत ७७ टक्के नागरिकांनी व्यक्त केले आहे.



    सर्व्हेत सहभागी झालेल्या नागरिकांनी सर्वाधिक पसंती आम आदमी पार्टीला दिली आहे. आपला ३६ टक्के नागरिकांनी पसंती दिली आहे. त्या खालोखाल काँग्रेसला ३५ टक्के, अकाली दलाला २१ टक्के, भाजपला २ टक्के तर इतर पक्षांना ६ टक्के पसंती दिली आहे. आपने सर्व पक्षांवर आघाडी घेत उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.विद्यमान १० आमदारांना पुन्हा उमेदवारी दिली गेली आहे.

    आपला सर्वाधिक ४७ ते ५३ जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर काँग्रेसला ४२ ते ५०, अकाली दलाला १६ ते २४, भाजपला १ आणि इतरांना १ जागा मिळेल, असा अंदाज आहे. पंजाब सरकारमध्ये मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांच्यातील वादाचा फटका काँग्रेसला बसेल, असे मत ६२ टक्के नागरिकांनी नोंदवले आहे.

    पंजाबमधील निवडणुकीत बेरोजगारी हा सर्वात मोठा मुद्दा ठरेल, असं मत सर्वाधिक ३८ टक्के नागरिकांनी नोंदवलं आहे. तर अंमली पदार्थ १३ टक्के, दहशतवाद ३ टक्के , शेतकरी आंदोलन ३८ टक्के आणि इतर मुद्द्यांवर ८ टक्के नागरिकांनी मत दिले आहे.

    In Punjab, Congress will be defeated, Aap will win the Assembly elections

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Indore High Court : मध्यप्रदेशातील 75 विद्यार्थ्यांसाठी पुन्हा नीट-यूजी परीक्षा होणार; इंदूर हायकोर्टाचा NTA ला आदेश

    Kolkata Law College : कोलकाता लॉ कॉलेज सामूहिक बलात्कार प्रकरण : दोन दिवस आधीच रचला होता कट, आरोपींची योजना तपासात उघड

    JNU Najeeb Ahmed Case : JNUचा बेपत्ता विद्यार्थी नजीब अहमदचा खटला बंद; दिल्ली कोर्टाने म्हटले- CBIला दोष देता येणार नाही, त्यांनी सर्व पर्याय वापरले