नुकताच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एके अँटोनी यांचा मुलगा अनिल अँटनी आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री किरण रेड्डी भाजपात प्रवेश केला आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : राहुल गांधी यांचे संसद सदस्यत्व रद्द झाल्यानंतर अडचणीत आलेल्या काँग्रेसला गेल्या दोन दिवसांत दोन मोठे झटके बसले आहेत. ज्येष्ठ नेते एके अँटोनी यांचा मुलगा अनिल अँटनी गुरुवारी भाजपमध्ये दाखल झाल्यानंतर, आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री किरण रेड्डी यांनीही शुक्रवारी भाजपात पक्षात प्रवेश केला. भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर किरण रेड्डी यांनी काँग्रेस हायकमांडच्या निर्णयांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. रेड्डी म्हणाले की, ‘’हायकमांड चुकीचे निर्णय घेत आहे, त्यामुळे सर्व राज्यांमध्ये परिस्थिती बिघडत आहे. दणदणीत पराभव होऊनही काँग्रेसच्या हायकमांडने कोणताही धडा घेतलेला नाही.’’ एखादा नेता पक्षाच्या हायकमांडला प्रश्न विचारण्याची ही पहिलीच वेळ नाही. In nine years 23 senior Congress leaders left the party calling the high command responsible
अलीकडेच गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेस सोडताना राहुल गांधींवर आरोप केला होता. विशेष म्हणजे आझाद यांची गणना गांधी घराण्याच्या जवळच्या व्यक्तींमध्ये होत होती. गेल्या ९ वर्षात जवळपास २३ बडे नेते काँग्रेसमधून निघून गेले आहेत. विशेष म्हणजे या सर्व नेत्यांनी काँग्रेस सोडण्यास राहुल गांधी आणि हायकमांडला जबाबदार धरले आहे.
काँग्रेसला सोडचिठ्ठी देणारे दिग्गज नेते –
या प्रमुख नेत्यांमध्ये यूपीमधील ज्येष्ठ नेते जगदंबिका पाल, हरियाणातील दिग्गज चौधरी बिरेंदर सिंग, छत्तीसगडचे मुख्यमंत्री असलेले अजित जोगी, आसाम सरकारमध्ये मंत्री असलेले हिमंता बिस्वा सरमा, ओडिशाचे मुख्यमंत्री असलेले गिरीधर गमंग, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि मनमोहन सरकारमधील परराष्ट्र मंत्री, एसएम कृष्णा, गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकर सिंह वाघेला, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि इंदिरा काळापासून काँग्रेसचे मजबूत नेते एनडी तिवारी, उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री विजय बहुगुणा, यूपी काँग्रेसच्या अध्यक्ष रिटा बहुगुणा जोशी, बिहार काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि एमएलसी अशोक चौधरी, महाराष्ट्रात महसूलमंत्री राहिलेले नारायण राणे, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, गांधी परिवाराच्या जवळचे आणि अमेठीचे मजबूत नेते संजय सिंह, अल्पेश ठाकोर, सोनिया गांधींच्या निकटवर्तीय टॉम वडाक्कन, उत्तराखंड काँग्रेसमधून राजीनामा देणारे ज्येष्ठ नेते सतपाल महाराज, पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते कॅप्टन अमरिंदर सिंग, बंगालमधील काँग्रेसचे प्रभारी आणि मनमोहन मंत्रिमंडळात मंत्री असलेले जितिन प्रसाद.
बिहार विधानपरिषदेत आता भाजपा बनला सर्वात मोठा पक्ष!
याशिवाय, २०१९ मध्ये मध्य प्रदेश काँग्रेसमध्ये सर्वात मोठे बंड ज्योतिरादित्य सिंधिया यांनी केले होते. राहुल गांधींचे निकटवर्तीय आणि माजी केंद्रीय मंत्री आरपीएन सिंह यांनीही काँग्रेस सोडली. कपिल सिब्बल यांनी २०२० मध्ये काँग्रेसच्या उदयपूर चिंतन शिबिरानंतर राजीनामा दिला. सिब्बल हे G-23 चे सक्रिय सदस्य होते. २०२२ च्या शेवटी काँग्रेसला सर्वात मोठा धक्का बसला, जेव्हा मजबूत नेते गुलाम नबी आझाद यांनी पक्षाचा राजीनामा दिला.
या २३ नेत्यांशिवाय अनेक बड्या नेत्यांनीही काँग्रेस सोडली आहे. यामध्ये प्रियांका चतुर्वेदी, हार्दिक पटेल, रिपुन बोरा, सुष्मिता देव, विश्वजित राणे, कीर्ती आझाद आणि ललितेश पती त्रिपाठी यांच्या नावांचा समावेश आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या स्थलांतरामुळे आसाम, यूपी या राज्यांमध्ये काँग्रेस खूपच कमकुवत झाली आहे.
In nine years 23 senior Congress leaders left the party calling the high command responsible
महत्वाच्या बातम्या
- अयोध्या हा आमच्यासाठी अतिशय श्रद्धेचा, भक्तीचा आणि अस्मितेचा विषय – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
- उद्धव ठाकरेंनी कुठूनही निवडणूक लढावी, त्यांच्याविरोधात मी लढायला तयार; नवनीत राणांचे आव्हान
- राहुलजी, नानांशी पंगा; अखेर आशिष देशमुखांचं काँग्रेसमधून निलंबन
- सरसंघचालक म्हणाले, ‘दक्षिण भारतात मिशनऱ्यांपेक्षा हिंदू धर्मगुरूंनी जास्त सेवा केली’
- Indian Space Policy 2023 : मोदी सरकारची ‘भारतीय अंतराळ धोरण 2023’ला मंजुरी