• Download App
    श्रीरामाची मूर्ती घडवण्यासाठी गंडकीतील शाळिग्राम शिळांचे अयोध्येत पुष्पवृटीत स्वागत!! In Gandaki to make an idol of Lord Rama A floral welcome to Shaligram Shilas in Ayodhya

    श्रीरामाची मूर्ती घडवण्यासाठी गंडकीतील शाळिग्राम शिळांचे अयोध्येत पुष्पवृटीत स्वागत!!

    प्रतिनिधी

    अयोध्या : अयोध्येचे श्रीरामाचे मंदिर पूर्णत्वास येत आहे, आता मंदिरातील श्रीरामाची मूर्ती घडवण्याची लगबग सुरु झाली आहे. त्यासाठी शाळिग्राम शिळा अयोध्येत दाखल झाली आहे. हे मंदिर जानेवारी २०२४ मध्ये बांधून पूर्ण होणार आहे. त्यामुळे राम मंदिराच्या कामाला गती आली असून प्रभू श्रीरामांची मूर्ती साकारण्यात येणाऱ्या शाळिग्राम शिळाही अयोध्येत दाखल होत आहेत. In Gandaki to make an idol of Lord Rama A floral welcome to Shaligram Shilas in Ayodhya

    संतांनीही पुष्पवृष्टी करत शिळांचे पूजन केले 

    गोरक्षनाथ मंदिरात रात्रीचा मुक्काम केल्यानंतर सकाळी ८ वाजता संत-महात्म्यांकडून पूजा-आरती झाल्यानंतर शाळिग्राम शिळांचे अयोध्येकडे प्रस्थान झाले. तत्पूर्वी नेपाळचे माजी गृहमंत्री आणि उपपंतप्रधान विमलेंद्र निधई यांनी सपत्नीक या शिळांची पूजा केली होती.

    नेपाळहून गोरखपूरला पोहोचलेल्या शाळिग्राम शिळा सकाळी अयोध्येसाठी रवाना झाल्या. गोरखपूरमध्ये या शिळांचे आगमन होताच, पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. विशेष म्हणजे मध्यरात्री ११ वाजण्याच्या सुमारास या शिळा गोरखपूरला पोहोचल्या होत्या. नंदानगर, मोहद्दीपुर, विश्वविद्यालय चौकात या शिळांचे भव्य स्वागत करण्यात आले.

    गोरक्षनाथ मंदिरात प्रमुख पुजारी कमलनाथ यांच्या नेतृत्त्वात संतांनीही पुष्पवृष्टी करत या शिळांचे पूजन केले. यावेळी, स्थानिक नेत्यांनीही, भाजपच्या मंत्र्यांनीही या शिळांचे पूजन करुन दर्शन घेतले. रात्रीचा मुक्काम गोरक्षनाथ मंदिरात झाल्यानंतर आज सकाळी शिळांचे प्रस्थान झाले. दरम्यान, सकाळच्या पूजा-आरतीलाही मोठ्या संख्यने भाविक जमा झाले होते. यावेळी, उपस्थित गर्दीला नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाला मोठी कसरत करावी लागली.

    In Gandaki to make an idol of Lord Rama A floral welcome to Shaligram Shilas in Ayodhya

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    EPFO 3.0: : EPFO-3.0, आता UPI-ATM मधून PFचे पैसे काढता येतील; 75% पर्यंत रक्कम काढण्याची सुविधा; आधार OTP द्वारे पडताळणी; खास ATM कार्ड मिळतील

    Karnataka : कर्नाटकात कारमध्ये स्फोट, युवकाचा मृत्यू; सोबत बसलेल्या तरुणीला चाकू मारला, धावत्या टॅक्सीतून मारली उडी, ड्रायव्हरही जखमी

    Sonia Gandhi : सोनिया गांधी म्हणाल्या- गाझात मुलांना संपवण्याचा प्रयत्न; भारत एकटा मौन बाळगून; जग इस्रायलपासून दूर जात आहे, भारत जवळ जातोय