विशेष प्रतिनिधी
मुंबई : पिंपरी-चिंचवडमधील मोशी येथे तब्बल २८ हेक्टर जागेत भारतीय व्यवस्थापन संस्था (IIM) नागपूरचा अत्याधुनिक शैक्षणिक आणि प्रशिक्षण कॅम्पस उभारण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने नाममात्र ₹१ वार्षिक भाडेपट्ट्यावर जमीन उपलब्ध करून देण्याचा शासन निर्णय जारी केला आहे. हा निर्णय म्हणजे पिंपरी-चिंचवडला ‘Education Hub’ बनविण्याच्या आपल्या संकल्पाला मिळालेली मोठी ताकद आहे.
विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे व्यवस्थापन शिक्षण, संशोधन आणि नवोन्मेषाच्या नव्या संधी उपलब्ध होतील. उद्योगनगरी आणि उच्च शिक्षण यांच्यातील भक्कम दुवा निर्माण करून शहराच्या विकासाला नवी दिशा मिळणार आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयासाठी भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र शासनाचे आभार मानले.
“पिंपरी-चिंचवड ही केवळ औद्योगिक नगरी नव्हे, तर शिक्षण, संशोधन आणि नवोन्मेषाचे जागतिक केंद्र व्हावे, हा आमचा संकल्प आहे. IIM कॅम्पस हा त्या दिशेने टाकलेला ऐतिहासिक टप्पा आहे, असे महेश लांडगे यांनी आपल्या सोशल मीडिया हॅंडलवर नमूद केले.
IIM Nagpur to set up a campus on a 28-hectare site in Moshi!!
महत्वाच्या बातम्या
- ममता आणि पवारांचे पक्ष काँग्रेसमध्ये विलीनीकरणाच्या नुसत्या चर्चा; पण अजून कार्यवाही का होई ना??
- PM Modi : मोदींनी ताकाइची यांना धाकटी बहीण म्हटले; जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधानांचे स्वागत; भारतात खताचे 1000 प्लांट लागतील
- महाराष्ट्रात ब्लॉकचेन – एआयच्या मदतीने जात पडताळणी; आदिवासी विकासाला नवी गती!!
- Rain Alert : पुढील 48 तास मराठवाडा-विदर्भासाठी महत्त्वाचे! मुसळधार पावसाचा इशारा; जाणून घ्या पुढील 5 दिवसांचा अंदाज