• Download App
    सरदार वल्लभभाई पटेल आणखी काही काळ जगले असते तर गोवा पोर्तुर्गिजांच्या राजवटीतून आधीच स्वतंत्र झाल असता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मत|If Sardar Vallabhbhai Patel had lived a little longer, Goa would have already become independent from Portuguese rule, says Prime Minister Narendra Modi

    सरदार वल्लभभाई पटेल आणखी काही काळ जगले असते तर गोवा पोर्तुर्गिजांच्या राजवटीतून आधीच स्वतंत्र झाल असता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मत

    विशेष प्रतिनिधी

    पणजी: देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल हे आणखी काही काळ जगले असते, तर गोवा पोतुर्गीजांच्या राजवटीतून बराच आधी स्वतंत्र झाला असता, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले.If Sardar Vallabhbhai Patel had lived a little longer, Goa would have already become independent from Portuguese rule, says Prime Minister Narendra Modi

    भारताच्या सशस्त्र दलांनी १९६१ साली ज्या दिवशी गोव्याला पोतुर्गीजांच्या राजवटीतून मुक्त केले, त्यानिमित्त दरवर्षी १९ डिसेंबरला साजºया केल्या जाणाºया गोवा मुक्ती दिनाच्या कार्यक्रमात पंतप्रधान बोलत होते. मोदी म्हणाले, गोवा स्वतंत्र होण्यापूर्वी बरेच आधी भारताला स्वातंत्र्य मिळाले असले,



    तरी देशातील लोक ते त्या वेळी त्याचा आनंद घेऊ शकले नाहीत, कारण देशाचा एक भाग अद्यापही परदेशी राजवटीखाली असल्यामुळे ते अस्वस्थ होते.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी गोव्यात पोहोचून पुनर्निर्मित फोर्ट अगुआडा जेल संग्रहालयाची पायाभरणी केली.

    गोवा वैद्यकीय महाविद्यालय, न्यू साउथ गोवा जिल्हा रुग्णालय, मोपा विमानतळावरील विमान कौशल्य विकास केंद्र आणि डावोरलिम, नावेलीम येथे गॅस-इन्सुलेटेड सबस्टेशन यासह अनेक विकास प्रकल्पांचे त्यांनी उद्घाटन केले. ते म्हणाले की, गोवा पोतुर्गीजांच्या अधिपत्याखाली आला जेव्हा देशातील अनेक भागात मुघलांचे राज्य होते.

    पण शतके उलटून गेली तरी गोवा आपले भारतीयत्व विसरला नाही आणि भारत गोव्याला विसरला नाही.गोव्यातील बार कौन्सिल ऑफ इंडिया ट्रस्टच्या इंडिया इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ लीगल एज्युकेशन अँड रिसर्चची पायाभरणीही मोदींनी केली. ते म्हणाले की, देशभरातील वैद्यकीय पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्याचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे.

    लोकांना उच्च दर्जाच्या वैद्यकीय सुविधा दिल्या पाहिजेत. या शृंखलेत, गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात 380 कोटी रुपयांहून अधिक खर्च करून प्रधानमंत्री आरोग्य सुरक्षा योजनेअंतर्गत एक सुपर स्पेशालिटी ब्लॉक निर्माण करण्यात आले आहे.

    If Sardar Vallabhbhai Patel had lived a little longer, Goa would have already become independent from Portuguese rule, says Prime Minister Narendra Modi

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य