वृत्तसंस्था
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात रविवारी संध्याकाळी दुबई येथे अवघ्या काही तासात खेळल्या जाणाऱ्या टी-ट्वेन्टी सामन्याची प्रतिक्षा साऱ्या क्रिकेट विश्वाला आहे. आजवरच्या एकाही वन-डे आणि टी-ट्वेन्टी वर्ल्ड कपमध्ये भारताने पाकिस्तानला जिंकू दिलेले नाही. हरण्याची ही परंपरा पाकिस्तान आज तरी मोडणार का की भारत नेहमीप्रमाणे अजिंक्य राहणार याची उत्सुकता लवकरच दूर होणार आहे.’If he clicks, he will make the match one-sided and finish it’: Sehwag before the match India vs Pakistan in T-20 world cup to be played shortly
टी-ट्वेन्टी वर्ल्ड कपमधील सर्वात औत्सुक्याचा सामना म्हणून भारत-पाकिस्तान सामन्याकडे पाहिले जात आहे. या सामन्याची सगळी तिकीटे फक्त तीन तासात संपली होती. एवढेच नव्हे तर दुबईतील सर्व हॉटेल, रेस्टॉरंटही या सामन्यामुळे ‘फुल्ल’ झाले आहेत.
दुबई इंटरनँशनल स्टेडियम या लढाईसाठी सज्ज झाले आहे. भारत आणि पाकिस्तानकडून मैदानात उतरणारे अंतिम अकरा कोण असतील यावर चर्चा सुरु आहेत. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम ने त्याच्या बारा खेळाडूंची घोषणा केली आहे. दुसरीकडे विराट कोहलीने भारतीय संघाचे पत्ते अजून उघड केलेले नाहीत. त्यामुळे भारताचे सलामीवीर कोण असतील, गोलंदाज कोण असतील यावरही सट्टा बाजारात बोली लागली आहे.
या पार्श्वभूमीवर वीरेंद्र सेहवागने त्याचे मत व्यक्त केले आहे. तो म्हणतो की हार्दिक पंड्याला मला भारतीय संघात खेळताना पाहायला आवडेल. हा सत्तावीस वर्षाच्या खेळाडूला रविवारची संध्याकाळ चांगली गेली तर भारत सहज जिंकेल. हार्दिकची स्फोटक फलंदाजी आणि उपयुक्त गोलंदाजीमुळे भारताचे पारडे वरचढ असेल, असे सेहवागला वाटते.
माझ्या संघात असेल. तो असा फलंदाज आहे की जर तो क्लिक झाला तर सामनाच एकतर्फी करुन टाकेल आणि संपवून टाकले. त्याची ही क्षमता त्याने यापूर्वी अनेकदा सिद्ध केली आहे. गोलंदाजीसाठी तो तंदुरूस्त असेल तर आणखीनच भारी,” असे वीरूने क्रिकबझला दिलेल्या मुलाखतीत म्हटले.
“भारताने पाच गोलंदाज आणि हार्दिक यांना मैदानात उतरवायला हवे. हार्दिक किंवा टॉप ऑर्डरमधील काही जणांना काही षटके टाकावी लागतील. पण हार्दिक जर फॉर्ममध्ये नसेल, तो नेट्समध्ये नीट फलंदाजी करत नसेल तर मात्र पर्याय शोधावा लागेल. अन्यथा मी हार्दिकचीच निवड करेन,” असे विरू म्हणाला.
ऑफ स्पिनर आर. अश्विन आणि लेग स्पिनर राहुल चहर यांच्यापेक्षा रविंद्र जडेजा-वरुण चक्रवर्ती ही फिरकी जोडगोळी भारतासाठी उपयुक्त ठरेल, असेही विरुला वाटते. “जडेजा मुळे गोलंदाजी सोबत फलंदाजीचाही पर्याय उपलब्ध होतो. पाकिस्तानकडे फकर झमन हा एकमेव डावखुरा फलंदाज असल्याने जडेजा चार षटके टाकू शकतो.
वरुण चक्रवर्ती पाकिस्तानविरुद्ध पहिलाच सामना खेळणार असल्याने पाकिस्तानी फलंदाजांना त्याचा अंदाज लवकर येणार नाही, त्यामुळे तो एक्स फँक्टर ठरू शकतो, ” असे विरुला वाटते. अश्विन आणि चहर हे सामान्य फिरकी गोलंदाज आहेत. पाकिस्तानी फलंदाज त्यांचा सहज सामना करु शकतील कारण ते फिरकी गोलंदाजी चांगले खेळतात, असे विरुने स्पष्ट केले.
वेगवान गोलंदाजी बद्दल वीरेंद्र सेहवाग म्हणाला की जसप्रित बुमराह आणि मोहमद शमी यांच्यासोबत तिसरा पर्याय भुवनेश्वर असला पाहिजे. इंग्लंडविरुद्धच्या वॉर्म अप सामन्यात भुवनेश्वर तितका फॉर्ममध्ये नव्हता. त्याचे चार षटकात पन्नास धावा दिल्या. पण कर्णधार कोहली त्याच्यावर नेहमीच विश्वास दाखवतो.
विरू म्हणाला की मी दमदार अनुभवाच्या जोरावर मी भुवनेश्वर कुमारची निवड करेन. अंतिम षटकात तो यॉर्कर्स टाकू शकतो. नवीा चेंडू दोन्ही बाजूला स्विंग करू शकतो. तो त्याच्या नेहमीच्या रिदममध्ये नक्कीच नाही पण भारत-पाकिस्तान सामन्यात हा मुद्दा महत्त्वाचा ठरत नाही. कारण या सामन्यात प्रत्येकजण त्याचे शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करत असतो.
‘If he clicks, he will make the match one-sided and finish it’: Sehwag before the match India vs Pakistan in T-20 world cup to be played shortly
महत्त्वाच्या बातम्या
- नाशिकच्या कांदा व्यापाऱ्यांवर प्राप्तिकरची धाड, 26 कोटींची रोख आणि 100 कोटींची बेहिशेबी मालमत्ता उघड; नोटा मोजताना अधिकारीही झाले घामाघूम
- Aryan Khan case : संजय राऊत म्हणाले – साक्षीदाराचा दावा धक्कादायक; नवाब मलिक म्हणाले- सत्याचाच विजय होईल!
- Aryan Khan Drug Case : फरार गोसावीच्या साथीदाराचा धक्कादायक खुलासा! एनसीबीने धमकावून घेतल्या कोऱ्या पंचनाम्यावर सह्या, 18 कोटींच्या डीलपैकी 8 कोटी समीर वानखेडेंना?
- राहुल आणि प्रियांका गांधी यांचे निकटवर्तीय अल्लू मियाँला लखनौमध्ये अटक, फसवणूक आणि खंडणीचे प्रकरण