वृत्तसंस्था
नंदीग्राम : पश्चिम बंगालमधील हायेस्ट व्होल्टेज नंदीग्राम मतदारसंघातील मतदान आज संघर्षमय वातावरणात संपुष्टात आले. येथे एकूण ८०.७९ टक्के मतदान झाले असून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि भाजपचे हेवीवेट उमेदवार सुवेंदू अधिकारी यांनी आपापल्या विजयाचे दावे केले आहेत.I will win Nandigram with the blessings of ‘Maa Maati Manush’: West Bengal CM Mamata Banerjee; Mamata stalled voting for 2 hours here, says suvendu adhikari
ममतांनी दिवसभर आज नंदीग्राममध्ये ठाण मांडून दुपारनंतर मतदान केंद्रावरच आंदोलन केले. त्यांनी तेथूनच राज्यपालांना फोन लावण्याचा राजकीय ड्रामा केला. ममतांनी मतदान रोखण्यासाठीच हा ड्रामा केल्याचा आरोप सुवेंदू अधिकारी यांनी केला.
ममतांनी आंदोलन करून दोन तास मतदान रोखून धरले. त्यामुळे येथे ७८ टक्केच मतदान होऊ शकले. पण नंदीग्राम मतदारसंघात अन्यत्र ९० टक्क्यांपर्यंत मतदान झाले, असे सुवेंदू अधिकारी यांनी पत्रकारांना सांगितले.
तर निवडणूक आयोगाने काहीही केले आणि भाजपने नंदीग्राममध्ये कितीही जंगजंग पछाडले तरी येथले ९० टक्के मतदान तृणमूळ काँग्रेसलाच झाले आहे. त्यामुळे आपला विजय पक्का असल्याचा दावा ममता बॅनर्जी यांनी केला आहे.
ममतांच्या पक्षाच्या निवडणूक आयोगाकडे ६३ तक्रारी
तृणमूळ काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे निवडणूकीतील गैरप्रकाराच्या ६३ तक्रारी अधिकृतरित्या नोंदविल्या आहेत. त्यावर निवडणूक आयोग काय कारवाई करतो, हे पाहावे लागेल. मला नंदीग्रामची चिंता नाही.
माँ, माटी, मानूष या घोषणेच्या आधारावर लोकांचे आशीर्वाद घेऊन मी इथे जिंकणारच आहे. पण मला लोकशाहीची काळजी वाटते, अशा शब्दांत ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोग आणि भाजपवर निशाणा साधला.