विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारतात कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता हॉंगकॉंगने भारताची विमानसेवा चौदा दिवसांसाठी स्थगित केली आहे. यानुसार २० एप्रिल ते ३ मे पर्यंत भारतातील उड्डाणांवर बंदी राहणार आहे. भारताशिवाय पाकिस्तान आणि फिलिपिन्स येथील उड्डाणे देखील थांबवण्यात आले आहेत.Hong cong stayed air service in India, pakistan
हॉंगकॉंगमध्ये कोरोनाचे आतापर्यंत ११,६८४ रुग्ण आढळून आले असून २०९ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या चोवीस तासात ३० हून अधिक रुग्णांची नव्याने भर पडली आहे. हॉंगकॉंग शहरात या विकएंडच्या अगोदर कोरोना संसर्गाच्या दोन नवीन प्रकाराचे रुग्ण आढळून आले.
गेल्या सात दिवसात भारत, फिलिपिन्स आणि पाकिस्तानातून पाच किंवा त्यापेक्षा अधिक संख्येने लोक हॉंगकॉंग येथे आले आणि त्यांच्यात कोरोनाचा नवीन म्युटेट व्हायरस आढळून आला. या कारणामुळे तिन्ही देशांची विमान सेवा थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला. यानुसार तीन देशांना खूप जोखमीचे देश या श्रेणीत समाविष्ट केले आहे.
हॉंगकॉंग विमानतळावरच्या तपासणीत भारतातून आलेल्या वीस प्रवाशांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. यात दोन प्रवासी हॉंगकॉंग आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि उर्वरित रुग्ण रिगल एअरपोर्ट हॉटेलमध्ये क्वारंटाइन सेंटरमध्ये सापडले.