• Download App
    पुण्यानंतर नागपुरात हिट अँड रन; अल्पवयीन मुलाने भरधाव कार गर्दीत घुसवली!|Hit and run in Nagpur after Pune The minor rammed the car into the crowd

    पुण्यानंतर नागपुरात हिट अँड रन; अल्पवयीन मुलाने भरधाव कार गर्दीत घुसवली!

    पाच जण गंभीर जखमी ; संतप्त जमावाने कार चालकास बेदम चोप दिला.


    नागपूर : ‘हिट अँड रन’ची मालिका महाराष्ट्रात सुरूच आहे. पुणे पोर्शची घटना अजूनही लोक विसरलेले नाहीत, असेच आणखी एक प्रकरण समोर आले आहे. आता नागपुरात भरधाव कारमुळे रस्ता अपघात झाल्याची घटना समोर आली आहे.Hit and run in Nagpur after Pune The minor rammed the car into the crowd

    नंदनवन पोलीस ठाण्यांतर्गत व्यंकटेशनगर चौकातील केडीके कॉलेजजवळ एक अल्पवयीन तरुण गाडी चालवत होता. अचानक त्याची स्कोडा गाडी नियंत्रणाबाहेर गेली, त्यानंतर ती प्रथम रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या काही दुचाकींना धडकली आणि नंतर फळ-भाजी विक्रेते आणि काही पादचाऱ्यांच्या गर्दीत घुसली. रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळल्यानंतर ती थांबली.



    त्यामुळे रस्त्यावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. फळ व भाजी विक्रेत्यांसह पाच जण जखमी झाले. दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. तेथे अनेक वाहनांचे नुकसान झाले. संतप्त जमावाने अल्पवयीन मुलाला कारमधून बाहेर काढले आणि रस्त्यावर खेचले. यानंतर त्याला जमावाने बेदम मारहाण केली, ज्यामुळे तो गंभीर जखमी झाला होता अखेर काही लोकांना त्याने मदतीचे आवाहन केले. त्यानंतर काही लोकांनी त्याला जमावापासून वाचवले आणि नंतर पोलिसांच्या ताब्यात दिले.

    ही हृदयद्रावक घटना शनिवारी दुपारी एकच्या सुमारास घडली. महेंद्र अग्रवाल, वंदना अग्रवाल, भाजी विक्रेते बसंती गोंड, गोलू साहू आणि कार्तिक अशी जखमींची नावे आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

    Hit and run in Nagpur after Pune The minor rammed the car into the crowd

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Goldie Brar : गोल्डी ब्रारने भाजपचे माजी खासदाराकडे मागितला पाच कोटींचा प्रोटेक्शन मनी

    UPI transactions : दोन हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या UPI व्यवहारांवर GST लादण्याची कोणतीही योजना नाही

    Mithun Chakraborty : मिथुन चक्रवर्ती यांनी बंगाल पोलिसांना म्हटले ‘मूक प्रेक्षक’