• Download App
    अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनलचा गैरकारभार उघड केल्यानेच पंतप्रधान नरेंद्र मोदींची बदनामी, हेमंत बिस्वा सरमा यांचा आरोप|Hemant Biswa Sarma alleges defamation of Prime Minister Narendra Modi for exposing Amnesty International's misconduct

    भारताची बदनामी करणाऱ्या अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनलवर बंदीच घातली पाहिजे; आसामच्या मुख्यमंत्र्यांची मागणी

    विशेष प्रतिनिधी

    गुवाहाटी: अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनलचा गैरकारभार उघड करून बॅँक खाती गोठविण्याची कारवाई मोदी सरकारने केली होती. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय पातळीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींची बदनामी करण्यासाठी पॅगासिस स्पायवेअरचे षडयंत्र रचले आहे. भारतविरोधी कारवाया करणाऱ्या अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनलवर बंदी घालण्याची मागणी आसामच्या मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी मंगळवारी केली.Hemant Biswa Sarma alleges defamation of Prime Minister Narendra Modi for exposing Amnesty International’s misconduct

    सरमा म्हणाले, अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनलने आत्तापर्यंत अनेक वेळा भारताच्या लोकशाहीवर आणि भारतीय नेतृत्वाविरोधात कट रचल्याचा इतिहास आहे. त्यामुळे पॅगासिस स्पायवेअरच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या षडयंत्राचा मी निषेध करतो. देशाची बदनामी करणाºया अशा संघटनांच्या कारवायांवर बंदी घालण्याची मागणी करत आहे.



    सरमा म्हणाले, अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनलने आत्तापर्यंत भारतातील डाव्या विचारांच्या दहशतवादाला उत्तेजन दिले आहे. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बदनामी करण्याची भूमिका सातत्याने मांडली आहे. भारतीय समाजात अंसतोष निर्माण करणे हे त्यांचे मुख्य काम काम आहे. त्यामुळे हे आंतरराष्ट्रीय षडयंत्र आहे.

    गेल्या वर्षभरात बेकायदेशीर विदेशी निधीच्या गैरवापराच्या आरोपावरून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. परदेशी योगदान (नियमन) कायद्यानुसार अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनलने कधीही नोंदणी केलेली नाही.

    त्यामुळे फेब्रुवारीमध्ये अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मनी लॉन्ड्रिंगच्या चौकशीचा एक भाग म्हणून अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनलची 17.66 कोटींची जंगम मालमत्ता जप्त केली होती. त्याचबरोबर गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये भारताच्या कार्यालयांवर अनेक छापे घालण्यात आले आणि बँक खाती गोठविण्यात आली होती. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनलने कामावरून काढले होते.

    अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनलनेही आपल्यावर कारवाई झाल्याचे मान्य केले होते. आमची बॅँक खाती गोठविली असल्याचे म्हटले होते. त्यामुळेच चिडून जाऊन भारताविरुध्द आणि प्रामुख्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बदनामी करण्याचा कट आखला जात आहे.

    पीगॅसस स्पायवेअरमार्फत पाळत ठेवल्याच आरोप फॉरबिडन स्टोरीज या स्वयंसेवी संस्थेने केला आहे. या संस्थेला अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनलने सहकार्य केले आहे. त्यांनी मिळविलेल्या डेटाबेसचे फोरेन्सिक विश्लेषण अमनेस्टी इंटरनॅशनलच्या सिक्युरिटी लॅबने केले होते.

    Hemant Biswa Sarma alleges defamation of Prime Minister Narendra Modi for exposing Amnesty International’s misconduct

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य