विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : चीनमधील हांगझोऊ येथे होत असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2023 मध्ये भारतीय खेळाडू दररोज अप्रतिम कामगिरी करताना दिसत आहे. विशेषकरून नेमबाजी, अॅथलेटिक्स ट्रॅक आणि फील्ड इव्हेंटमध्ये खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्यातलंच एक नाव आहे हरमिनल बैंस. या स्टार महिला खेळाडूने यापूर्वी 1500 मीटर शर्यतीत रौप्य पदक जिंकले होते. आता बुधवारी, 4 ऑक्टोबर रोजी तिने 800 मीटर शर्यतीतही रौप्यपदक जिंकून आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. हरमिनल बैंस हिने 800 मीटरच्या अंतिम फेरीत 2:03.75 अशी वेळ नोंदवली आणि देशासाठी दुसरे रौप्यपदक जिंकले. A mother and daughter who put everything at stake to win a medal for the country in the Asian Games
जर आपण हरमिलनबद्दल बोलायचं म्हटलं, तर या आशियाई खेळांपूर्वी बहुतेकांना तिचे नाव माहित देखील नसेल. पण आता ही खेळाडू चर्चेचा विषय ठरली आहे. पहिल्या पदकानंतर तिचे फोटोही सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. हरमिलन बेन्स कोण आहे, ती कुठून आली आहे, तिची कौटुंबिक पार्श्वभूमी काय आहे हेही अनेकांना जाणून घ्यायला आवडत आहे. तिच्याशी संबंधित एक विशेष घटना अशीही आहे की तिने आईच्या पोटातच शर्यत सुरू केली, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण, तिची आई देखील खेळाडू होती आणि तिनेही देशाला आशिया स्पर्धेत पदक मिळवून दिलं होतं.
हरमिलन कौर बैंस ही पंजाबमधील होशियारपूर येथील रहिवासी आहे. विशेष म्हणजे तिची आई आणि वडील दोघेही खेळाडू आहेत. तिचे वडील अमनदीप बैंस यांनी दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत 1500 मीटर शर्यतीत रौप्य पदक जिंकले होते. तर आई माधुरी सिंग हिने 2002 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्य पदक जिंकले होते. याशिवाय माधुरी सिगं यांना 2003 मध्ये अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
हरमिलनचा जन्म 23 एप्रिल 1998 रोजी झाला होता आणि तिच्या जन्मापूर्वीची एक घटना खूप चर्चेत आहे. खरं तर, असं म्हटलं जातं की, अॅथलीट कुटुंबातून आलेल्या हरमिलनने तिची पहिली शर्यत तिच्या आईच्या पोटातूनच केली होती. वास्तविक गोष्ट अशी आहे की, हरमिलनची आई माधुरी यांना एकदा नोकरीसाठी १५०० मीटर शर्यतीसाठी ट्रायल द्यावी लागली होती. त्यावेळी हरमिलनचा जन्म झाला नव्हता व ती माधुरीच्या पोटातच होती. त्यामुळेच हरमिलनची पहिली शर्यत तिच्या आईच्या पोटातूनच सुरू झाली असे म्हणतात. आता या स्टार खेळाडूने 2023 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत एकदा नव्हे तर दोनदा रौप्य पदक जिंकून देशाचा मान वाढवला आहे.
Harmilan Kaur Bains A mother and daughter who put everything at stake to win a medal for the country in the Asian Games
महत्वाच्या बातम्या
- सुपरस्टार राम चरण याच्या 41 दिवसाच्या व्रताची सांगता!
- पालकमंत्री पद मिळवून अजितदादांनी शिंदे गटावर मात केल्याची बातमी; पण दादांना राजकीय किंमत करावी लागणार चुकती!!
- आशियाई क्रीडा स्पर्धेत ७१ पदकं जिंकून भारताने स्वतःचाच विक्रम मोडत रचला इतिहास
- जम्मू काश्मीर : कुलगाममध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक, दोन दहशतवादी ठार