• Download App
    लसीबाबत अल्पसंख्याक समाजाच्या मनातील शंकाकुशंका सरकार दूर करणार|Govt. solve the droughts in the minds of people

    लसीबाबत अल्पसंख्याक समाजाच्या मनातील शंकाकुशंका सरकार दूर करणार

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : लसीकरणाबाबत व लसीबाबत अल्पसंख्याक समाजाच्या मनातील वाढती शंकाकुशंका व भीती दूर करण्यासाठी केंद्र सरकारतर्फे ‘जान है तो जहान है” ही जनजागृती मोहीम येत्या योगदिनापासून (ता. २१ जून) देशभरात सुरू करण्यात येणार आहे. यासाठी अल्पसंख्याक धर्मगुरूंचेही सक्रिय साहाय्य घेतले जाणार आहे.Govt. solve the droughts in the minds of people

    लसीकरणाबाबत काही स्वार्थी लोक शंका उपस्थित करत आहेत व हे लोक सामाजिक स्वास्थ्याचे शत्रू आहेत, हे लोकांच्या मनावर यानिमित्ताने ठसविले जाणार आहे. त्यामुळे सध्या अल्पसंख्यांक समाजात लसीकरणाचे प्रमाण फार कमी राहिलेले आहे.



    यामध्ये विविध धार्मिक संघटना व मदरसे, शैक्षणिक व स्वयंसेवी संस्था, महिला बचत गट, ग्रामीण सहकारी संस्था आदींमध्ये मंत्रालयाचे स्वयंसेवक जाऊन लसीकरणाबाबतच्या कुशंकांना उत्तरे देऊन शंकानिरसन करतील.

    राज्यांतील हज समित्या, वक्फ बोर्ड, वक्फच्या शैक्षणिक संस्था, केंद्रीय वक्फ परिषद, मौलाना आझाद एज्युकेशन फाउंडेशन यांचीही सक्रिय मदत घेतली जाईल. ग्रामीण भाग व अल्पसंख्याकांच्या निवासी भागात मान्यवरांचे संदेश पोहोचविण्यात येतील. लघुपट, पथनाट्य व कविता वाचनाचे कार्यक्रम आयोजित केले जातील.

    Govt. solve the droughts in the minds of people

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    हेमंत सोरेन यांना पुन्हा धक्का! ED कोर्टाने फेटाळला अंतरिम जामीन

    उज्ज्वल निकमांना उमेदवारी; म्हणे, पूनम महाजनांचा पत्ता कट; पण हा तर खरा त्या पलीकडचा “मास्टर स्ट्रोक”!!

    ‘ममता बॅनर्जींना अटक करा, अन् ‘TMC’ला दहशतवादी संघटना घोषित करा’