• Download App
    नारदा घोटाळ्यात ममतांच्या ४ मंत्र्यांना अटक झाल्यानंतर तृणमूळ काँग्रेसने आरोप केला, राज्यपाल रक्तपिपासू झाले आहेत!!|Governor has vindictively done this without consultation of state govt. Governor has become a bloodsucker, allages TMC MP Kalyan Banerjee

    नारदा घोटाळ्यात ममतांच्या ४ मंत्र्यांना अटक झाल्यानंतर तृणमूळ काँग्रेसने आरोप केला, राज्यपाल रक्तपिपासू झाले आहेत!!

    वृत्तसंस्था

    कोलकाता : नारदा घोटाळ्यात ममता बॅनर्जी सरकारमधील ४ मंत्र्यांना अटक झाल्यानंतर तृणमूळ काँग्रेसने राज्यपाल जगदीप धनकर यांच्यावर ते रक्तपिपासू झाल्याचा आरोप केला आहे.Governor has vindictively done this without consultation of state govt. Governor has become a bloodsucker, allages TMC MP Kalyan Banerjee

    हा आरोप करण्यापूर्वी तृणमूळ काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी सीबीआय कार्यालयासमोर राडा घातला आणि दगडफेकही केली.नारदा घोटाळा प्रकरणात कोलकाता हायकोर्टाच्या आदेशानुसार फिरहाद हकीम यांच्याशिवाय



    सीबीआयने सुब्रत मुखर्जी, तृणमूल कॉंग्रेसचे आमदार मदन मित्रा आणि माजी महापौर सोव्हान चटर्जी यांनाही अटक केली. त्यांच्यावरील कायदेशीर कारवाईस राज्यपालांची संमती होती.

    मात्र, आपल्या ४ नेत्यांना अटक झाल्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्वतः सीबीआय ऑफीस गाठून स्वतःलाच अटक करण्याची मागणी केली. त्याचवेळी तृणमूळ काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी सीबीआय ऑफीससमोर राडा घातला.

    या प्रकरणात राज्यपाल जगदीप धनकर यांनी हस्तक्षेप करून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे कायदा आणि सुव्यवस्थेकडे लक्ष वेधले. सीबीआय ऑफीससमोर दगडफेक झाली आहे.

    कोलकाता आणि पश्चिम बंगालच्या पोलीसांनी नुसती बघ्याची भूमिका घेतली आहे. कायदा आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे, असे जगदीप धनकर यांनी स्पष्ट केले.

    राज्यपालांच्या या वक्तव्यावरून तृणमूळ काँग्रेसचे नेते खवळले आहेत. कोविड काळात पोलीस कोणावरही अनावश्यक कारवाई करू शकत नाहीत, असे सुप्रिम कोर्टाचे आदेश आहेत.

    पण त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी दबाव आणला गेल्याचा आरोप तृणमूळ काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी केला. राज्यपाल रक्तपिपासू झाले आहेत. त्यांना २०२४ च्या निवडणूकीत भाजपच्या तिकीटाची अपेक्षा आहे

    म्हणून राजकीय आकसापोटी त्यांनी तृणमूळच्या नेत्यांविरोधातील कारवाईसाठी परवानगी दिली, असा आरोप बॅनर्जी यांनी केला.सीबीआयने ४ नेत्यांना अटक केली, त्या विरोधात तृणमूळ काँग्रेस सुप्रिम कोर्टात दाद मागणार आहे, असे बॅनर्जी यांनी स्पष्ट केले

    Governor has vindictively done this without consultation of state govt. Governor has become a bloodsucker, allages TMC MP Kalyan Banerjee

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    गुजरात-राजस्थानमध्ये सुरू होते ड्रग्जचे रॅकेट ATS-NCBने केला पर्दाफाश!

    महादेव बेटिंग ॲप प्रकरणी अभिनेता साहिल खानला अटक, मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

    Vande Metro Train: वंदे मेट्रो ट्रेन लवकरच सुरू होणार, प्रवाशांना मिळणार इंटरसिटीसारख्या सुविधा!