• Download App
    आंतरराष्ट्रीय विमानांची भरारी १५ डिसेंबरपासून; कोरोनाच्या संकटामुळे होती वर्षभर बंद । Government has allowed the resumption of scheduled commercial international passenger services wef 15 Dec 21.

    आंतरराष्ट्रीय विमानांची भरारी १५ डिसेंबरपासून; कोरोनाच्या संकटामुळे होती वर्षभर बंद

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय विमानसेवा १५ डिसेंबरपासून पूर्ववत सुरु होणार आहे. कोरोनाच्या संकटामुळे गेल्या वर्षभरांपासून ती बंद करण्यात आली होती. ती पुन्हा सुरु होत असल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. Government has allowed the resumption of scheduled commercial international passenger services wef 15 Dec 21.



    केंद्रीय विमान वाहतूक मंत्रालयाने याबाबतची घोषणा केली आहे. त्यामुळे आता १५ डिसेंबरपासून आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक सुरळीत होण्याचा मार्ग मोकळा झाला. केंद्रीय गृहमंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय आणि आरोग्य मंत्रालयाशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
    दोन दिवसांपूर्वीच नागरी हवाई वाहतूक सचिव राजीव बन्सल यांनी आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान सेवा लवकरच पूर्ववत होण्याचे संकेत दिले होते.

    • केव्हा झाली बंद : २२ मार्च २०२० पासून
    • स्थगितीची मुदत : ३० नोव्हेंपर्यंत वाढवण्यात आली
    • ‘एअर बबल’ व्यवस्था : २५ हून अधिक देशांसोबत आहे. दोन देशांमधील विमान कंपन्या काही अटींच्या अधीन राहून एकमेकांच्या
    • भूप्रदेशात विमानांचे संचालन करू शकतात.
    • केव्हा सुरु होणार : १५ डिसेंबरपासून

    Government has allowed the resumption of scheduled commercial international passenger services wef 15 Dec 21.

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Ram Mandir : राम मंदिराचे विश्वस्त अनिल मिश्रा यांची बंद दाराआड चौकशी; एसआयटीने गोपाल राव यांना बाहेर बसवले, देणगी चोरीतील आरोपींच्या घरावर बुलडोझर कारवाईची तयारी

    पवारांच्या पक्ष काँग्रेसमध्ये विलीन झाल्यावर काँग्रेसची ताकद वाढेल, की गटबाजी वाढेल??

    Myanmar Cyber Scam : एआयद्वारे फसवणूक; स्कॅमर 100 भाषांतून फसवताहेत; म्यानमारमध्ये 50 हजार फसवणुकीचे लक्ष्य, पूर्ण न झाल्यास विजेचा धक्का आणि तरुणींवर बलात्कार