• Download App
    गोवा हत्याकांड : CEO महिलेने चार वर्षांच्या चिमुकल्याची अशी केली हत्या!|Goa massacre CEO woman killed a four year old child like this

    गोवा हत्याकांड : CEO महिलेने चार वर्षांच्या चिमुकल्याची अशी केली हत्या!

    पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये झाला खुलासा


    विशेष प्रतिनिधी

    गोव्यात एका आईने क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. चार वर्षांच्या चिमुकल्याच्या हत्येचे प्रकरण समोर येताच सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया उमटू लागल्या. मुलाची हत्या केल्यानंतर आईने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा दावा पोलिसांनी मंगळवारी केला होता. दरम्यान, शवविच्छेदन करणार्‍या डॉ.कुमार नाईक यांनी 36 तासांपूर्वी मुलाची हत्या झाल्याचे उघड केले. गळा दाबल्याने मुलाचा मृत्यू झाल्याचे समोर आले.Goa massacre CEO woman killed a four year old child like this



    द माइंडफुल एआय लॅबच्या सीईओ सुचना सेठ यांना सोमवारी रात्री कर्नाटकातील चित्रदुर्ग येथून गोव्यातील सर्व्हिस अपार्टमेंटमध्ये मुलाची हत्या केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. पोलिसांनी सांगितले की, सुचना सेठचा विभक्त झालेला पती व्यंकट रमण मंगळवारी संध्याकाळी जकार्ताहून भारतात परतला आणि त्याला मुलाच्या हत्येची माहिती मिळाली.

    डॉ.कुमार नाईक म्हणाले की, लहान मुलांचा गळा हाताने दाबून खून करण्यात आला होता असे दिसत नाही, मृतदेह बघून ही घटना उशी किंवा अन्य काही साहित्याचा वापर करून घडल्याचे दिसते. नाईक यांना हत्येची निश्चित वेळ सांगता आली नाही पण ते म्हणाले 36 तास अगोदर झाली होती.

    Goa massacre CEO woman killed a four year old child like this

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    India Satellite : भारतात लवकरच थेट उपग्रहाद्वारे इंटरनेट; मस्क यांची स्टारलिंक 30-31 ऑक्टोबरला मुंबईत डेमो देणार

    Cricketer Azharuddin : माजी क्रिकेटपटू अझरुद्दीन तेलंगणा सरकारमध्ये मंत्री होणार; 31 ऑक्टोबर रोजी शपथ घेणार

    राहुल गांधींनी मोदींच्या हाती आयता दिला मुद्दा; बिहारच्या निवडणुकीत “अपमान” तापला!!