वृत्तसंस्था
नवी दिल्ली : सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्या निधनामुळे देशाने एक कट्टर देशभक्त सैनिक आणि महान सेनापती गमावला आहे, अशा भावपूर्ण शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. Gen Bipin Rawat was an outstanding soldier
जनरल बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांचे तामिळनाडूतील हेलिकॉप्टर दुर्घटनेत निधन झाले. त्यानंतर पंतप्रधानांनी ट्विट करून जनरल रावत आणि त्यांच्या पत्नीला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
सायंकाळी साडेसहा वाजता कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी अफेयर्सची पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यामध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, संरक्षणदलांचे तिन्ही प्रमुख लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंड नरवणे, हवाईदल प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही. आर. चौधरी, नौदल प्रमुख ॲडमिरल हरिकुमार तसेच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल उपस्थित होते. यानंतर जनरल रावत यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंतिम संस्कार करण्यात विषयी निर्णय घेण्यात आला.
Gen Bipin Rawat was an outstanding soldier
महत्त्वाच्या बातम्या
- अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि नायका कंपनीच्या सीईओ फाल्गुनी नायर यांचा फोर्ब्ज मॅगझीनच्या जगातील सर्वात प्रभावशाली 100 महिलांमध्ये समावेश
- मोठी बातमी : अरब देशांना अन्नधान्य निर्यातीत भारत पहिल्या क्रमांकावर, १५ वर्षांनंतर ब्राझीललाही टाकले मागे
- टेरर फंडिंग; पाकिस्तानात मोकाट फिरणाऱ्या सय्यद सलाउद्दीन विरुद्ध दिल्ली कोर्टाचे समन्स