• Download App
    G20 चे परराष्ट्रमंत्री भारतीय कणखर नेतृत्वाची सराहना करताहेत; राहुल गांधी भारतात लोकशाही नसल्याचे केंब्रिजमध्ये सांगताहेत!!|G20 Foreign Ministers Appreciate India's Strong Leadership; Rahul Gandhi says in Cambridge that there is no democracy in India!!

    G20 चे परराष्ट्रमंत्री भारतीय कणखर नेतृत्वाची सराहना करताहेत; राहुल गांधी भारतात लोकशाही नसल्याचे केंब्रिजमध्ये सांगताहेत!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : भारतीय लोकशाही व्यवस्थेसाठी आज “राजकीय विसंगत” दिवस आहे. एकीकडे विकसित आणि विकसनशील G20
    देशांचे परराष्ट्रमंत्री भारतीय नेतृत्वाची सराहना करत आहेत, तर दुसरीकडे काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल गांधी भारतात लोकशाही जिवंत नसल्याचे केंब्रिज मध्ये जाऊन सांगत आहेत.G20 Foreign Ministers Appreciate India’s Strong Leadership; Rahul Gandhi says in Cambridge that there is no democracy in India!!

    G20 च्या परराष्ट्र मंत्र्यांची महत्वपूर्ण परिषद सध्या राजधानी नवी दिल्लीत सुरू आहे. त्यातच भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया जपान अशा “क्वाड” देशांची बैठक देखील रायसीना डायलॉगच्या निमित्ताने झाली. या रायसीना डायलॉगमध्ये अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान या तीनही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी भारतीय नेतृत्वाची प्रशंसा केली. भारतीय नेतृत्वाखाली क्वाड देश आंतरराष्ट्रीय पातळीवर दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी कठोर भूमिका घेत आहेत.



    त्या संदर्भात स्टॅंडर्ड ऑपरेशन मोड कसा असावा हे ठरवत आहेत. आंतरराष्ट्रीय दहशतवादाविरोधात प्रगत आणि प्रगतिशील देशांची मजबूत साखळी तयार करण्याचे काम भारत स्वतःच्या नेतृत्वाखाली करत आहे, त्याला अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया यांचा पाठिंबा आहे, अशी ग्वाही त्या देशाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी दिली आहे. इतकेच नाही, तर रशिया युक्रेन युद्धामध्ये भारतीय नेतृत्व मध्यस्थी करू शकते. भारताचे दोन्ही देशांशी मजबूत विश्वासार्ह संबंध आहेत, अशी ग्वाही देखील या परराष्ट्र मंत्र्यांनी दिली.

    पण एकीकडे हे घडत असताना दुसरीकडे खासदार राहुल गांधी मात्र केंब्रिजमध्ये जाऊन भारतात लोकशाही जिवंत नसल्याचा दावा केला आहे. त्यासाठी त्यांनी पेगासस हेरगिरीचे उदाहरण दिले आहे. माझ्या मोबाईल फोन मध्ये पेगासन इन्स्टॉल आहे. मला अनेकदा त्या संदर्भात फोन आले होते. ते फोन टॅप केले गेले. भारतामध्ये विरोधकांमागे वेगवेगळ्या केंद्रीय तपास संस्था सोडून कारवाई सुरू आहे. विरोधकांचा आवाज अवैधरित्या बंद करण्याचा हा प्रयत्न आहे. भारतात लोकशाही जिवंत असण्याचे हे लक्षण नाही, असा आरोप राहुल गांधींनी केंब्रिजमध्ये केला आहे.

    एकीकडे जी 20 देशांचे परराष्ट्र मंत्री भारतीय नेतृत्वाची सराहना करतात. त्यांच्या कणखर नेतृत्वाखाली आंतरराष्ट्रीय दहशतवादाशी मुकाबला, ग्रीन टेक्नॉलॉजी, सोलर इनिशिएटिव्ह, वन ग्लोब अशा अभिनव संकल्पना राबविण्याचा प्रयत्न करतात, तर दुसरीकडे भारतात लोकशाही नाही, असा डांगोरा राहुल गांधी इंग्लंडमध्ये जाऊन पिटतात ही राजकीय विसंगती आज समोर आली आहे.

    G20 Foreign Ministers Appreciate India’s Strong Leadership; Rahul Gandhi says in Cambridge that there is no democracy in India!!

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Rahul Gandhi भारतात नेहरुंचे री ब्रँडिंग करून राहुल गांधी अमेरिकेत; सॅम पित्रोदांकडून जोरदार स्वागत!!

    Malegaon : मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल न्यायालयाने ठेवला राखून

    Murshidabad : मुर्शिदाबाद हिंसाचार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकांवर उद्या होणार सुनावणी