• Download App
    पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रकृतीची विचारपूस केल्यानंतर भावुक झाले माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा, म्हणाले माझे मन जिंकले आहे.|Former Prime Minister H.D. Modi became emotional after Prime Minister Narendra Modi inquired about his health. Devegowda, said my heart has won.

    पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रकृतीची विचारपूस केल्यानंतर भावुक झाले माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा, म्हणाले माझे मन जिंकले आहे.

    राजकारणाच्या पलीकडे मैत्र जपताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. मोदींनी आस्थेवाईकपणे आपल्या तब्येतीबाबत काळजी व्यक्त केल्यामुळे माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा भावुक झाले. मोदींनी माझे मन जिंकले आहे, असे ते म्हणाले.Former Prime Minister H.D. Modi became emotional after Prime Minister Narendra Modi inquired about his health. Devegowda, said my heart has won.


    विशेष प्रतिनिधी

    बेंगळुरू: राजकारणाच्या पलीकडे मैत्र जपताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. मोदींनी आस्थेवाईकपणे आपल्या तब्येतीबाबत काळजी व्यक्त केल्यामुळे माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा भावुक झाले. मोदींनी माझे मन जिंकले आहे, असे ते म्हणाले.

    माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा आणि त्यांच्या पत्नीलाही करोनाचा संसर्ग झाला आहे. त्यांनी स्वत:ला आयसोलेट केलं आहे. ८७ वर्षीय देवेगौडा यांनी ट्वीट करून ही माहिती दिली आहे. पत्नी चेन्नम्मा आणि मला करोनाचा संसर्ग झाला आहे.



    आम्ही कुटुंबातील इतर सदस्यांसह स्वत:ला आयसोलेट केले आहे. गेल्या काही दिवसात आमच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी करोनाची चाचणी करून घ्यावी. पक्ष कार्यकर्ते आणि हितचिंतकांनी काळजी करू, असं देवेगौडा यांनी ट्वीट केलं आहे.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यानंतर देवेगौडा यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यांनी लवकर बरं व्हावं, यासाठी प्रार्थना केली आहे. पंतप्रधान मोदींनी यासंदर्भात ट्वीट केलं आहे. माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांच्याशी आपण बोललो. ते आणि त्यांच्या पत्नीच्या प्रकृती विषयी आपण विचारपूस केली. त्यांना लवकर बरं वाटावं यासाठी आपण प्रार्थना करतो, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

    देवेगौडा यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले आहेत. त्यांनी यासंदर्भात ट्वीट केलं आहे. पंतप्रधान मोदींनी फोन करू आपल्या प्रकृतीची विचारपूस केली, याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. त्यांनी मला एक ऑफरही दिली आहे.

    मी कुठल्याही शहरात कुठल्याही हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार घेऊ शकते, असे ते म्हणाले. या ऑफरने त्यांनी माझं मन जिंकलं आहे. पण आपण बेंगळुरूतच उपचार घेऊ. इथे आपल्यावर चांगले उपचार केले जात आहेत. आपल्या प्रकृतीविषयी त्यांना कळवत राहीन, असं देवेगौडा ट्वीटमध्ये म्हणाले.

    Former Prime Minister H.D. Modi became emotional after Prime Minister Narendra Modi inquired about his health. Devegowda, said my heart has won

    Related posts

    Rahul Gandhi in the press conference : राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत उल्लेख केलेल्या ‘राजुरा’ मतदारसंघात कोण जिंकलं ?

    Election Commissioner : निवडणूक आयुक्तांवर खटला दाखल करता येतो का ? काय आहेत कायद्यातील तरतुदी

    Disha Patani : दिशा पटानीच्या घरावर गोळीबार करणारे ठार; गाझियाबादेत एसटीएफने केले एन्काउंटर