• Download App
    Tehreek e Insaf इस्लामाबादमध्ये 'पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ

    Tehreek e Insaf : इस्लामाबादमध्ये ‘पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ ‘च्या रॅलीवर गोळीबार

    Tehreek e Insaf

    माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या सुटकेसाठी निदर्शने सुरू होती.


    विशेष प्रतिनिधी

    इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची तुरुंगातून सुटका करण्याच्या मागणीसाठी पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ ( Tehreek e Insaf  ) (पीटीआय) ने रविवारी काढलेल्या रॅलीत गदारोळ झाला. सरकारवर दबाव टाकण्यासाठी काढण्यात आलेल्या रॅलीदरम्यान हा गोळीबार झाल्याचे वृत्त आहे.

    पीटीआयने या घटनेचा एक व्हिडिओ शेअर केला असून, सरकारने पक्षाचा आवाज दाबल्याचा आरोप केला आहे आणि परिस्थितीला अघोषित मार्शल लॉ म्हणून संबोधले आहे.



    तर इस्लामाबादमधील या रॅलीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. याठिकाणी ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच अनेक रस्ते बंद करण्यात आले आहेत.

    या घटनेवर इम्रानच्या पक्षाने म्हटले की, शांततेने आंदोलन करणाऱ्यांवर गोळीबार करणाऱ्या पोलिसांना लाज वाटली पाहिजे. इस्लामाबादचे आयजी आणि सरकारने असे निष्पाप लोकांच्या जीवाशी खेळणे बंद करावे. आज जनतेने सरकारला चोख प्रत्युत्तर दिले आहे.

    Firing at a rally of Pakistan Tehreek e Insaf in Islamabad

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Andhra Pradesh : आंध्र प्रदेशातील फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट; 21 लोकांचा मृत्यू, 8 गंभीर जखमी; 5 किमीपर्यंत ऐकू आला स्फोटाचा आवाज

    Rule Change Today: एलपीजी सिलिडर महागले… एटीएफच्या किमती वाढल्या, आजपासून देशभरात 5 मोठे बदल

    India GDP : तिसऱ्या तिमाहीत GDP वाढ 7.8% राहिली; 50% ट्रम्प टॅरिफ असूनही अर्थव्यवस्था मजबूत