• Download App
    तर शेतकरी पार्लमेंटमध्ये जाऊन आपले धान्य विकतील; राकेश टिकैत यांचा मोदी सरकारला इशारा| farmers will go to Parliament and sell their grain; Rakesh Tikait warns Modi government

    … तर शेतकरी पार्लमेंटमध्ये जाऊन आपले धान्य विकतील; राकेश टिकैत यांचा मोदी सरकारला इशारा

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : गाजीपुर सिंघू, टिकरी आदी दिल्लीच्या बॉर्डर्स खुल्या होताच भारतीय किसान युनियन पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीकास्त्र सोडताना आम्ही पार्लमेंटमध्ये जाऊन आमचे धान्य विकू, असे म्हटले आहे. farmers will go to Parliament and sell their grain; Rakesh Tikait warns Modi government

    कोर्टाच्या आदेशानुसार दिल्ली तसेच हरियाणा पोलिसांनी आज सिंघू, गाजीपुर टिकरी आदी दिल्लीच्या बॉर्डर्स खोलल्या. तिथले बॅरिकेट्स हटवले. आंतरराज्य वाहतूक यामुळे सुरळीत होईल, असे वक्तव्य दिल्लीचे पोलिस आयुक्त राकेश अस्थना यांनी केले आहे. शेतकरी आंदोलनादरम्यान या बॉर्डर बंद करण्यात आल्या होत्या. परंतु आता त्या खुल्या झाल्याने एक सकारात्मक वातावरण तयार होईल, असे मत देखील यांनी व्यक्त केले आहे.



    मात्र या पार्श्वभूमीवर भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत मात्र यांनी मात्र मोदी सरकारला धारेवर धरले आहे. मुळात दिल्लीच्या बॉर्डर शेतकरी आंदोलकांनी बंद केल्या नव्हत्या. पोलिसांनी त्या बंद केल्या असल्याचा दावा टिकैत यांनी केला.

    त्याच वेळी टिकैत यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जर भारतातला शेतकरी कुठेही धान्य विकू शकतो असे म्हणतात तर आता आम्ही दिल्लीच्या पार्लमेंटमध्ये जाऊन आमचे धान्य विकू, असे वक्तव्य केले आहे.

    यातून एक प्रकारे मोदी सरकारला त्यांनी पार्लमेंटला घेराव घालण्याचा इशारा दिला आहे. याआधी देखील राकेश टिकैत यांच्यासह अनेक शेतकरी नेत्यांनी पार्लमेंटला घेराव घालण्याचा इशारा दिला आहेच.

    farmers will go to Parliament and sell their grain; Rakesh Tikait warns Modi government

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    President Murmu : राष्ट्रपती मुर्मूंनी पाणबुडी INS वाघशीरमधून प्रवास केला, असे करणाऱ्या दुसऱ्या राष्ट्रपती

    Lucknow : लखनौमध्ये शियांचे अधिवेशन, मौलाना म्हणाले- वंदे मातरमच्या नावाखाली घाबरवले जातेय, पाकसारखी वागणूक मिळतेय

    Mohan Bhagwat : भागवत म्हणाले- संघाचे ध्येय हिंदू समाजाला एकत्र करणे, सनातन धर्म पुन्हा जिवंत करण्याची वेळ आली आहे