• Download App
    संयुक्त किसान मोर्चा करणार देशभरातील राजभवनावर निदर्शने |Farmers will demonstrates on all over country

    संयुक्त किसान मोर्चा करणार देशभरातील राजभवनावर निदर्शने

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : मागील सात महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या संयुक्त किसान मोर्चाने सरकारवर दबाव वाढविण्यासाठी २६ जूनला देशभरातील सर्व राजभवनावर निदर्शने करण्याची घोषणा केली आहे.Farmers will demonstrates on all over country

    शेतकरी नेते इंद्रजितसिंग यांनी ही घोषणा करताना २६ जूनला या निदर्शनांसोबतच शेती वाचवा, लोकशाही वाचवा हा दिवसी पाळला जाईल, असे सांगितले. याच दिवशी (२६ जून) १९७५ मध्ये आणीबाणी लागू झाली होती



    आणि शेतकरी आंदोलन देखील याच दिवशी सात महिने पूर्ण करत आहे. या दडपशाहीच्या वातावरणात शेतीसोबतच लोकशाहीवरही हल्ला झाला असून ही अघोषित आणीबाणी आहे, असे टीकास्त्र इंद्रजितसिंग यांनी सोडले.

    आंदोलनाची आक्रमकता वाढविण्यासाठी संयुक्त किसान मोर्चाने मागील महिन्यात मोदी सरकारच्या सत्तास्थापना दिनी २६ मेस काळा दिवस पाळला होता. आता आंदोलनाला सात महिने पूर्ण होत असल्याबद्दल २६ जूनला देशभरातील राजभवनावर निदर्शने करून आपली ताकद दाखविण्याचा निर्णय घेतला आहे.

    Farmers will demonstrates on all over country

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Raghuram Rajan : रघुराम राजन म्हणाले- रशियन तेल खरेदीबाबत पुन्हा विचार व्हावा; याचा फायदा कोणाला?

    Lovely Anand : खासदार लवली आनंद म्हणाल्या- राहुल गांधींची यात्रा अयशस्वी; जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो