• Download App
    आंदोलन शेतकऱ्यांचे, मोदींकडून कृषी कायदे रद्द; श्रेयात मात्र काँग्रेस पुढे; आज शेतकरी विजय दिवस!! |Farmers' agitation, Modi repeals agricultural laws; Congress is ahead in credit; Today is Farmers Victory Day

    आंदोलन शेतकऱ्यांचे, मोदींकडून कृषी कायदे रद्द; श्रेयात मात्र काँग्रेस पुढे; आज शेतकरी विजय दिवस!!

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात पंजाब, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेश मधल्या शेतकऱ्यांनी गेले दीड वर्ष आंदोलन केले. त्या आंदोलनावरून देशात मोठ्या प्रमाणावर वाद-विवाद झाले. आंदोलनाच्या व्यासपीठावर कोणत्याही राजकीय पक्षाने येऊ नये, अशी भूमिका भारतीय किसान युनियन आणि अन्य शेतकरी संघटनांनी घेऊन ती कायम ठेवली.Farmers’ agitation, Modi repeals agricultural laws; Congress is ahead in credit; Today is Farmers Victory Day

    या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कार्तिक पौर्णिमा गुरुनानक जयंती प्रकाश पर्व हे निमित्त साधून कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा केली. या मुद्द्यावरून राजकारण अधिकच तापले असून त्यामध्ये काँग्रेसने वेगळ्या प्रकारे उडी घेतली आहे. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी, प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर टीका करताना शेतकरी आंदोलनात सातशे जणांचे बळी गेले त्याचा हिशेब कोण देणार?, असा सवाल केला आहे.



     

    पण त्याच वेळी कृषी कायदे मोदींनी रद्द केल्याचे श्रेय घेण्यासाठी काँग्रेस पुढे सरसावली असून पक्ष आज देशभर शेतकरी विजय दिवस साजरा करणार आहे. काँग्रेस मुख्यालयातून सर्व प्रदेश कार्यालयांना यासंदर्भात आदेश काढण्यात आले आहेत. काँग्रेस नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी देशभरातील शहरांमध्ये, गावांमध्ये जाऊन शेतकरी विजयी मेळावे घ्यावेत. शेतकरी विजयी रॅली काढाव्यात आणि शेतकरी विजय दिवस साजरा करावा, असे आदेश काँग्रेस मुख्यालयाने दिले आहेत.

    कृषी कायदे मोदींनी रद्द केलेत. पण कोणत्याही राजकीय पक्षाला त्याचे श्रेय नाही, असे शेतकऱ्यांनी स्पष्ट केले आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी देखील सर्व विरोधी पक्षांना फटकारले आहे. कृषी कायदे रद्द झाले याचे श्रेय फक्त शेतकरी आंदोलकांचे आहे. विरोधी पक्षांचे अजिबात नाही, अशी प्रतिक्रिया अण्णा हजारे यांनी व्यक्त केली आहे. काँग्रेस मात्र या प्रतिक्रियांना टाळून स्वतः पुढाकार घेत देशभर शेतकरी विजय दिवस साजरा करत आहे.

    Farmers’ agitation, Modi repeals agricultural laws; Congress is ahead in credit; Today is Farmers Victory Day

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Mehbooba Mufti : मेहबूबा म्हणाल्या- लाल किल्ल्यासमोर काश्मिरी समस्यांचे पडसाद; सरकारचे जम्मू-काश्मीर सुरक्षित ठेवण्याचे आश्वासन, पण दिल्लीच धोक्यात

    India US : टॅरिफनंतर भारत-अमेरिका यांच्यात पहिला करार; भारत आपल्या गरजेच्या 10% गॅस अमेरिकेकडून खरेदी करणार

    Anil Ambani : हवाला प्रकरणात अनिल अंबानी दुसऱ्यांदा गैरहजर; ऑनलाइन स्टेटमेंट देण्याची विनंती; 100 कोटींशी संबंधित हवाला प्रकरण