• Download App
    एलॉन मस्क यांची भारतात इंटरनेट सेवा; भागीदारीसाठी भारत नेटचाही समावेश ?|Elon Musks SpaceX to soon begin talks with Jio Vodafone Idea for satcom collaboration India head

    एलॉन मस्क यांची भारतात इंटरनेट सेवा; भागीदारीसाठी भारत नेटचाही समावेश ?

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती अशी ओळख असलेले एलॉन मस्क हे भारतात इंटरनेट सेवा देण्यासाठी उत्सुक आहेत. स्टारलिंक प्रोजेक्ट्सद्वारे भारतात लवकरच इंटरनेट सेवा सुरू करण्याची त्यांची योजना असून त्यासाठी ते भागीदाराच्या शोधात आहेत. त्यामध्ये सहकार्य करणाऱ्या इच्छुकांमध्ये भारत नेटचा समावेश आहे.
    Elon Musks SpaceX to soon begin talks with Jio Vodafone Idea for satcom collaboration India head

    रिलायन्स जिओ (Reliance Jio), व्होडाफोन आयडिया (Vodafone Idea), भारत नेट (BharatNet) आणि Raitel या कंपन्यांनावर मस्क यांची कंपनी स्पेसएक्सची (SpeceX) सॅटेलाईट ब्रॉडबँड कंपनी स्टारलिंक (Starlink) ग्रामीण क्षेत्रा तील ब्रॉडबँड सेवांवर लक्ष केंद्रीत करू शकते.



    भारतातील SpaceX ची सहयोगी कंपनी स्टारलिंकचे कंट्री डायरेक्टर संजय भार्गव म्हणाले, नीति आयोगाद्वारे पहिल्या टप्प्याअंतर्गत १२ जिल्ह्यांची निवड केली आहे.१०० टक्के ब्रॉडबँड योजना मिळेल जी अन्य जिल्ह्यांसाठी एक मॉडेल म्हणून काम करेल असंही ते म्हणाले.

    पाच हजारपेक्षा अधिक बुकिंग

    स्टारलिंकला भारतात पाच हजारांपेक्षा अधिक प्री-बुकिंग ऑर्डर्स मिळाल्या आहेत. कंपनी प्रति ग्राहक ९९ डॉलर्स अथवा ७३५० रूपये आकारात आहे. तसंच बीटा टप्प्यात ५० ते १५० एमबीपीएस प्रति सेकंद स्पीड देण्याचा दावा आहे. दरम्यान, सध्या देशात रिलायन्स जिओ, एअरटेलसारख्या कंपन्या सेवा देत आहेत, अशातच मस्क हे भारतात का सेवा देऊ इच्छित आहेत, असा प्रश्न उपलब्ध केला जात आहे.

    काय आहे स्टारलिंक

    एलॉन मस्क हे स्टारलिंक द्वारे इंटरनेट सेवा पुरवत आहेत. दरम्यान, भारतात ते याची सुरूवात करू इच्छित आहेत. या सेवेची सुरूवात करण्यासाठी मस्क यांना रेग्युलेटरीच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे.

    एलन मस्क हे अमेरिकेसहित काही देशांमध्ये आपली सेवा देत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार सध्या ही सेवा १५०० पेक्षा अधिक सॅटेलाईट्सद्वारे पुरवण्यात येत आहे. कंपनी प्रोजेक्टच्या पहिल्या टप्प्यात १२ हजार सॅटेलाईट लाँच करू शकते.

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    हेमंत सोरेन यांना पुन्हा धक्का! ED कोर्टाने फेटाळला अंतरिम जामीन

    उज्ज्वल निकमांना उमेदवारी; म्हणे, पूनम महाजनांचा पत्ता कट; पण हा तर खरा त्या पलीकडचा “मास्टर स्ट्रोक”!!

    ‘ममता बॅनर्जींना अटक करा, अन् ‘TMC’ला दहशतवादी संघटना घोषित करा’