• Download App
    जगात तब्बल २७५५ अब्जाधीश, १४० अब्जाधीशांसह भारताची तिसऱ्या स्थानी झेप | Number of billionaires increased in Indian and world too

    जगात तब्बल २७५५ अब्जाधीश, १४० अब्जाधीशांसह भारताची तिसऱ्या स्थानी झेप

    विशेष प्रतिनिधी

    बीजिंग – जगातील एकूण अब्जाधीशांच्या संख्येत सर्वाधिक भर चीनने घातली आहे. गेल्या आर्थिक वर्षांत चीनमध्ये २१० जण अब्जाधीश झाले. यातील निम्मे जण तंत्रज्ञान कंपनीचे मालक आहेत. यात केट वँग या महिला उद्योजिकेचाही समावेश आहे.

    त्यांची ई-सिगारेटची कंपनी आहे. चीनमधील अब्जाधीशांच्या संख्येत वेगाने वाढ झाली आहे. जगातील सर्वाधिक ७२४ अब्जाधीश अमेरिकेत असले तरी चीन ६९८ अब्जाधीशांसह दुसऱ्या स्थानावर आहे. १४० अब्जाधीशांसह भारत तिसऱ्या स्थानावर आहे.



    फोर्बच्या यंदाच्या यादीत ४९३ अब्जाधीशांची भर पडली आहे. सध्या जगात एकूण २७५५ अब्जाधीश आहेत. जगातील एकूण अब्जाधीशांपैकी सर्वाधिक अब्जाधीश चीनची राजधानी बीजिंगमध्ये रहातात. गेल्या वर्षीच्या तुलनेत बीजिंगमधील अब्जाधीशांच्या संख्येत ३३ ची भर पडली असून या शहरात आता शंभर अब्जाधीश आहेत.

    सलग सात वर्षे क्रमांक एकवर असलेल्या न्यूयॉर्कमध्ये ९९ अब्जाधीश आहेत. चीनमध्ये कोरोना संसर्गावर लवकर नियंत्रण मिळविले गेल्याने तंत्रज्ञान कंपन्या आणि शेअर बाजाराने इतर जगाच्या तुलनेत मोठी झेप घेतली. यामुळे या शहरातील उद्योगांना मोठा फायदा होऊन अब्जाधीशांच्या संख्येत वाढ झाली.


    वाचा आणखी महत्वाच्या बातम्या

    Related posts

    येमेनजवळ अमेरिकन युद्धनौकेवर हल्ला, अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयात खळबळ!

    WorldEconomicForum Davos : महाराष्ट्रात 1.37 लाख कोटींचे गुंतवणूक करार; 100000 रोजगार निर्मिती

    Indian economy : सरकारच्या उपाययोजनांची कमाल, भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर 9.2 टक्के, यापुढेही कायम राहणार वेग