2021 साठी फोर्ब्सने 10 अब्जाधीशांची यादी जाहीर केली असून, आरआयएलचे अध्यक्ष मुकेश अंबानी पहिल्या क्रमांकावर आणि गौतम अदानी दुसर्या क्रमांकावर आहेत.
कमाईच्या बाबतीत गौतम अदानी यांनी गेल्या वर्षी अमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस आणि टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलोन मस्क यांना मागे टाकले . तथापि, ते अजूनही रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या मागे आहेत.
2020 पासून जगासह देशात कोरोना महामारीने थैमान घातले आहे. भारतीय अर्थव्यवस्थेला यामुळे मोठा फटका बसला. असे असले तरी देशातील सर्वाधिक श्रीमत व्यक्तींच्या संपत्तीमध्ये वाढ पाहायला मिळाली आहे. शिवाय देशातील अब्जाधीशांची संख्याही वाढली आहे. 2020 मध्ये अब्जाधीशांची संख्या 102 वरुन 140 पर्यंत वाढली. या अब्जाधीशांची एकूण संपत्ती तब्बल 596 अब्ज अमेरिकी डॉलर आहे. Forbes List of India’s 10 Richest Billionaires
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी पुन्हा एकदा फोर्ब्सच्या भारतातील पहिल्या 10 अब्जाधीशांच्या यादीत अव्वल स्थान मिळवले आहे. 5 मार्च 2021 पर्यंत आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती 84.5 अब्ज डॉलर्स इतकी आहे. उल्लेखनीय म्हणजे, फोर्ब्सच्या 35 व्या वार्षिक जगातील अब्जाधीशांच्या यादीमध्ये मुकेश अंबानी 10 व्या स्थानावर आहेत.
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या चेअरमननंतर गौतम अदानी आणि शिव नादर यांचा क्रमांक लागतो. फोर्ब्सने म्हटले आहे, ‘कोविड-19 साथीच्या काळात, अंबानी यांनी आपल्या कंपन्यांसाठी मोठा निधी उभारणीची कामगिरी केली. 2021 पर्यंत रिलायन्स इंडस्ट्रीजचे निव्वळ कर्ज शून्यावर आणण्याचे लक्ष्य गाठण्यासाठी त्यांनी, 35 अब्ज डॉलर्सची कमाई केली.’ गुगल आणि फेसबुक सारख्या जागतिक गुंतवणूकदारांनी जिओमध्ये गुंतवणूक केली आहे. अंबानींच्या मालकीच्या कंपनीत फेसबुकचा 9.99 टक्के हिस्सा आहे.
अंबानीच्या पाठोपाठ अदानी ग्रुपचे गौतम अदानी यांचा नंबर लागतो. 2021 मध्ये अदानी यांची संपत्ती पाच पटीने वाढली आहे. कोविड-19 च्या साथीच्या रोगात गौतम अदानी 42 अब्ज डॉलर्सनी अधिक श्रीमंत झाल्यामुळे या यादीमध्ये ते दुसर्या क्रमांकावर आहेत. कोळसा खाणी व्यतिरिक्त बंदरे, विमानतळ जोडून अदानी आपल्या समूहाचा मोठ्या प्रमाणात विस्तार करीत आहेत. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर अदानीने 74 टक्के भागभांडवल संपादन केले आहे.
एचसीएल टेक्नोलॉजीज लिमिटेडचे संस्थापक आणि माजी अध्यक्ष शिव नादर तिसऱ्या क्रमांकावर आहेत, तर राधाकिशन दमानी भारतातील चौथ्या क्रमांकाचे श्रीमंत आहेत. नुकतेच दमानी आणि त्यांच्या भावाने दक्षिण मुंबईत तब्बल 1,001 कोटी रुपयांमध्ये दोन मजली इमारत विकत घेतली आहे. दमानीची सुपरमार्केट चेन डीमार्टचे देशभरात 221 स्टोअर्स आहेत.
पुढे उदय कोटक पाचव्या क्रमांकावर आहे. लक्ष्मी मित्तल, कुमार बिर्ला आणि सायरस पूनावाला अनुक्रमे सहाव्या, सातव्या आणि आठव्या स्थानावर आहेत. सन फार्मास्युटिकल्सचे संस्थापक दिलीप शघनवी हे नववे श्रीमंत भारतीय आहेत. भारती एंटरप्रायजेसचे अध्यक्ष सुनील मित्तल आणि त्यांचे कुटुंबीय फोर्ब्स इंडियाच्या सर्वात श्रीमंत यादीत दहाव्या स्थानावर आहेत.
भारतातीय 10 सर्वात श्रीमंत व्यक्ती पुढीलप्रमाणे
1. मुकेश अंबानी( 84.5 अब्ज डॉलर)
-कोरोना महामारीच्या काळातही मुकेश अंबानी यांनी विविध माध्यमातून फंड गोळा केला. त्यांनी 2021 मध्ये रिलायन्स इंडस्ट्रिवर असणारे कर्ज शुन्यावर आणले. त्यांनी जीओमधला काही भाग विकला. यातून त्यांनी मोठा फंड गोळा केला आहे.
2. गौतम अदानी (50.5 अब्ज डॉलर)
– अदानी यांनी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळातील 74 टक्के भागिदारी मिळवली आहे. शिवाय अदानी ग्रीन एनर्जीमधील 20 टक्के भाग विकून त्यांनी 2.5 अब्ज डॉलर मिळवले होते.
3. शीव नादर (23.5 अब्ज डॉलर)
-शिव नादर यांनी मागील वर्षी जूलै महिन्यात HCL Technologies च्या प्रमुखपदावरन पायउतार होण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्यानंतर त्यांची मुलगी रोशनी नादर मल्होत्रा यांनी ही जबाबदारी संभाळली आहे.
4. राधाकिशन दमानी (16.5अब्ज डॉलर)
-रिटेलिंग किंग राधाकिशन दमानी अॅव्हेन्यू सुपरमार्केट चेन अंतर्गंत देशात एकूण 221 DMart चालवतात.
5. उदय कोटक (15.9 अब्ज डॉलर)
-देशातील सर्वाधिक श्रीमंत बँकर उदय कोटक यांनी कोटक महिंद्रा बॅंकेची स्थापना केली होती. ही देशातील चौथी सर्वात मोठी खासगी क्षेत्रातील बँक आहे. मागिल वर्षी जूनमध्ये कोटकने 95.0 लाख डॉलर्स किंमतीचे शेअर विकले होते.
6. लक्ष्मी मित्तल (14.9 अब्ज डॉलर)
7. कुमार बिर्ला ( 12.8 अब्ज डॉलर)
8. सायरस पुनावाला (12.7 अब्ज डॉलर)
9. दिलीप संघवी (10.9 अब्ज डॉलर)
10. सुनिल मित्तल अँड फॅमिली (10.5 अब्ज डॉलर)