• Download App
    कॉँग्रेसच्या काळातच राफेल विमानांसाठी दलाली, संबित पात्रा यांनी पुरावेच देऊन केले तोंड बंद|During the time of Congress, Rafel brokered for planes, Sambit Patra closed congress mouth by giving evidence

    कॉंग्रेसच्या काळातच राफेल विमानांसाठी दलाली, संबित पात्रा यांनी पुरावेच देऊन केले तोंड बंद

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : राफेल विमान सौद्यासाठी दसॉल्ट कंपनीने २००७ ते २०१२ या कालावधीत ६५ कोटींची दलाली दिली होती. त्यावेळी कॉंंग्रेसचे सरकार होते. राफेल व्यवहारात त्यांच्याच सरकारच्या कार्यकाळात घोटाळा झाला आहे. राहुल गांधी यांनी याबाबत उत्तर द्यावे, असा पलटवार भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी केला आहे.During the time of Congress, Rafel brokered for planes, Sambit Patra closed congress mouth by giving evidence

    राफेल विमान खरेदी व्यवहारासंदर्भात फ्रान्समधील नियतकालिकाने केलेल्या दाव्यानंतर कॉंंग्रेस आणि भाजप समोरासमोर उभे ठाकले आहेत. ६५ कोटी रुपयांच्या दलालीवरून दोन्ही पक्षांनी एकमेकांवर आरोप केले आहेत. हा केवळ ६० ते ८० कोटींच्या दलालीचा घोटाळा नसून, आतापर्यंतचा सर्वांत मोठा संरक्षण घोटाळा असल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे. याप्रकरणाची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करण्याची मागणी कॉंंग्रेसने केली आहे.



    दसॉल्ट एव्हिएशनने सुशेन गुप्ता याला ६५ कोटी रुपयांची दलाली दिल्याचा दावा मीडियापार्ट या फ्रेंच नियतकालिकाने केला होता. यावरून कॉंंग्रेसचे नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी ट्विट करून सरकारवर आरोप केले आहेत.

    प्रियंका गांधींनी राफेलसंबंधी वृत्त शेअर करून, काळा पैसा संपविण्याचे स्वप्न दाखून भाजपने देशाला रांगेत उभे केले. मात्र, भाजपच्या राज्यात काळे कृत्य लपविण्यासारख्या कामांची रांग लागली आहे, अशी टीकाही त्यांनी केली. तर भ्रष्ट सरकारच्या विरोधात असेच लढत राहण्याचे आवाहन राहुल गांधी यांनी केले.

    मात्र, संबित पात्रा यांनी या प्रकरणातील हवाच काढून घेतली आहे. दसॉल्ट कंपनीने २००७ ते २०१२ या कालावधीत ६५ कोटींची दलाली दिली होती. या काळात केंद्रात कॉँग्रेसचे सरकार होते. मग दलाली घेतली कोणी असा सवाल त्यांनी केला आहे.

    During the time of Congress, Rafel brokered for planes, Sambit Patra closed congress mouth by giving evidence

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र

    रोजगाराच्या संधी वाढल्या, EPFOने फेब्रुवारीमध्ये १६.१ लाख सदस्य जोडले