• Download App
    तामिळनाडूत 21 महापालिकांमध्ये द्रमुकची आघाडी; 3 नगरपालिकांमध्ये भाजपने खोलले खाते!! DMK leads in 21 Municipal Corporations in Tamil Nadu

    तामिळनाडूत 21 महापालिकांमध्ये द्रमुकची आघाडी; 3 नगरपालिकांमध्ये भाजपने खोलले खाते!!

    वृत्तसंस्था

    चेन्नई : तामिळनाडूत 21 महापालिका 498 नगरपालिका निवडणुकीचे निकाल आज लागत असून 21 महापालिकांमध्ये सुरुवातीच्या मतमोजणीत सत्‍ताधारी द्रविड मुन्नेत्र कळघमने आघाडी घेतली आहे. त्याखालोखाल अण्णा द्रमुकने आपली कामगिरी उंचावली असून 21 पैकी पाच महापालिकांमध्ये अण्णाद्रमुक आघाडीवर आहेDMK leads in 21 Municipal Corporations in Tamil Nadu


    तामिळनाडू : विरुधुनगर जिल्ह्याजवळ फटाके बनवणाऱ्या कारखान्याला भीषण आग , ३ जण ठार ; ५ जखमी


    तामिळनाडूच्या राजकारणात राजकीय अस्तित्व नसलेल्या भाजपने नगरपालिकांमध्ये मात्र आपले खाते खोलले असून तिरुपूर, कारूर आणि नागरकोईल या नगरपालिकांमध्ये भाजपने प्रत्येकी एका जागांवर विजय मिळवला आहे. भाजपने तामिळनाडूत प्रथमच स्थानिक पातळीवर कोणतीही आघाडी न करता स्वतंत्रपणे निवडणूक लढवली आहे तामिळनाडू भाजपचे प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई यांच्या नेतृत्वाखालची ही पहिली निवडणूक आहे. तामिळनाडूतील प्रत्येक शहर आणि गावांमध्ये भाजप पोहोचविण्याचे महत्त्वाचे काम अण्णामलाई यांच्या नेतृत्वाखाली भाजपने केले आहे.

    अर्थात मतमोजणीचे हे सुरुवातीचे ट्रेंड असून सत्ताधारी द्रमुकने आपले वर्चस्व कायम राखल्याचे दिसत आहे.

    DMK leads in 21 Municipal Corporations in Tamil Nadu

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Modi च्या भाषणात no between the lines; पाकिस्तानच्या छातीवर केलाय वार, पाकिस्तान-दहशतवाद्यांना एकच न्याय आणि nuclear blackmail bye bye!!

    Trade आणि terrorism, रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाहीत; पाकिस्तान बरोबरच अमेरिकेलाही पंतप्रधान मोदींचा इशारा!!

    विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा अन् इंस्टावर भावनिक पोस्ट