• Download App
    धोनी पैसे वाटतोयच्या नावाखाली महिलेला फसवून दीड वर्षांच्या मुलीचे अपहरण!! dhoni is distributing cash group scam women kidnap her 1year old girl

    धोनी पैसे वाटतोयच्या नावाखाली महिलेला फसवून दीड वर्षांच्या मुलीचे अपहरण!!

    वृत्तसंस्था

    रांची : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी हा गोरगरिबांना पैसे वाटतोय असे सांगून एका महिलेला फसवून तिच्या दीड वर्षांच्या मुलीचे अपहरण झाल्याचा प्रकार रांचीत घडला आहे. तीन दिवसांपूर्वी हा गुन्हा घडूनही अद्याप झारखंड पोलिसांना कुठलाही सुगावा लागलेला नाही. dhoni is distributing cash group scam women kidnap her 1year old girl

    याची कहाणी अशी :

    रांची जिल्ह्यातील जगन्नाथपुर येथील रहिवासी मधु देवी आपल्या दोन मुलींबरोबर एका मार्केटमध्ये कपडे खरेदी करत होती. तेथे एका महिलेबरोबर एक बाईकस्वार आला आणि त्या महिलेने मधु देवीला महेंद्रसिंह धोनी गरिबांना पैसे वाटतोय आणि घरे देतो आहे, असे सांगितले. या महिलेच्या जाळ्यात मधु देवी अडकली आणि तिने आपल्या आठ वर्षांच्या मुलीला मार्केटमध्ये खाऊच्या स्टॉलवर सोडले आणि त्या बाईक स्वाराबरोबर पुढे गेली. बाईकस्वराने वीज कार्यालयापाशी गाडी थांबवली आणि त्या महिलेला त्या कार्यालयात धोनीची पैसे वाटण्याची बैठक सुरू असल्याचे सांगितले.

    मधु देवीचे लक्ष तिकडे वळल्याबरोबर बाईकस्वार आणिशत्या महिलेने मधु देवीच्या दीड वर्षांच्या मुलीला घेऊन पोबारा केला. मधु देवी हिने नंतर पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींचा माग काढण्याचा प्रयत्न केला पण त्यांना अद्याप यश आलेले नाही. हा गुन्हा घडून तीन दिवस होऊन गेले, पण अद्याप गुन्हेगार किंवा संबंधित अपहृत मुलीचा पत्ता लागलेला नाही.

    dhoni is distributing cash group scam women kidnap her 1year old girl

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Gurnoor Kaur : पंजाबच्या तरुणीची जगभरात चर्चा! ऑक्सिमीटरमधील वर्णभेदाची समस्या सोडवली; कोण आहे गुरनूर कौर?

    India-US Trade : भारत-अमेरिका व्यापार करारावर नवे संकट? सक्तीच्या मजुरीचा आरोप करत अमेरिकेची अतिरिक्त करवाढ प्रस्तावित

    Trinamool Congress : ममतांची TMC फुटली, 58 आमदारांनी वेगळा गट तयार केला:ऋतब्रत बॅनर्जी विधिमंडळ पक्षाचे नेते घोषित, 2 दिवसांपूर्वी पक्षातून काढले होते