Delhi Police : दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने एका पाकिस्तानी दहशतवाद्याला अटक केली आहे. हा दहशतवादी राजधानीत घातपात घडवण्याच्या प्रयत्नात होता. स्पेशल सेलने दहशतवाद्याकडून एके -47 आणि हातबॉम्बदेखील जप्त केला आहे. हा दहशतवादी भारतावर हल्ला करण्यासाठी पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयने तयार केला होता. दहशतवाद्याला अटक करण्यात आली असून त्याची चौकशी केली जात आहे. Delhi Police arrest Pakistani terrorist, avert major terror attack in capital
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने एका पाकिस्तानी दहशतवाद्याला अटक केली आहे. हा दहशतवादी राजधानीत घातपात घडवण्याच्या प्रयत्नात होता. स्पेशल सेलने दहशतवाद्याकडून एके -47 आणि हातबॉम्बदेखील जप्त केला आहे. हा दहशतवादी भारतावर हल्ला करण्यासाठी पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयने तयार केला होता. दहशतवाद्याला अटक करण्यात आली असून त्याची चौकशी केली जात आहे.
दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाने सांगितले की, मोहम्मद अशरफ उर्फ अली नावाच्या पाकिस्तानी व्यक्तीला सोमवारी रात्री 9.20 वाजता दिल्लीच्या लक्ष्मी नगर भागातून अटक करण्यात आली. मोहम्मद अशरफ हा पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील नरोवाल जिल्ह्याचा रहिवासी आहे.
मोहम्मद अशरफ भारतीय नागरिक म्हणून वावरत होता. यासाठी त्याने आपले बनावट नाव मोहम्मद नूरी ठेवले होते आणि बनावट ओळखपत्रही बनवले होते. दिल्लीतील शास्त्रीनगरमधील आराम पार्क परिसरातील एका घरात तो राहत होता. त्याने भारतीय ओळखपत्र बनवण्यासाठी बनावट कागदपत्रे वापरली होती.
सूत्रांकडून कळले आहे की, हा दहशतवादी दिल्लीत मोठा दहशतवादी हल्ला करण्यासाठी आला होता. आयएसआयने त्याला शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षण दिले होते. त्यानंतर तो नेपाळमार्गे भारतात दाखल झाला.
स्पेशल सेलने त्याच्याकडून एक हँडबॅग, दोन मोबाइल फोन जप्त केले. त्याच्याकडून एके -47, मॅगझिन आणि 60 गोळ्याही जप्त करण्यात आल्या आहेत. त्याच्या जागी कालिंदी कुंज घाटातून एक हातबॉम्ब, दोन पिस्तूल आणि 50 काडतुसेही जप्त करण्यात आली आहेत. कालिंदी कुंजजवळ यमुनेच्या किनाऱ्यावरील वाळूखाली ही शस्त्रे पुरलेली होती. तुर्कमन गेट परिसरातून एक भारतीय पासपोर्टदेखील जप्त केला आहे.
आरोपी मोहम्मद अशरफ ऊर्फ अलीविरुद्ध यूएपीए, स्फोटक कायदा, शस्त्र कायदा यासह अनेक कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लक्ष्मी नगरमधील रमेश पार्क येथील त्याच्या अड्ड्यावरही शोध घेण्यात आला आहे. सणासुदीच्या काळात तो एका मोठ्या हल्ल्याची योजना आखत होता, असे पोलिसांचे मत आहे. पोलीस पथक त्याची चौकशी करत आहे आणि भारतात त्याला कोण मदत करत होते, नेपाळमार्गे तो कोणत्या मार्गाने भारतात पोहोचला आणि या संपूर्ण षडयंत्रात त्याचे सहाय्यक कोण आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
Delhi Police arrest Pakistani terrorist, avert major terror attack in capital
महत्त्वाच्या बातम्या
- मोठी बातमी : मुंद्रा बंदरातील ड्रग्ज जप्तीप्रकरणी राजधानी दिल्ली आणि एनसीआरमध्ये NIAचे 5 ठिकाणी छापे
- G20 Leaders Summit : अफगाणिस्तान मुद्द्यावर आज जी-20 नेत्यांची शिखर परिषद, पंतप्रधान मोदी होणार सहभागी
- ADR : शिवसेनेसह 14 पक्षांना निवडणूक रोख्यांमधून 50 टक्के देणगी, टीआरएसला मिळाले 130 कोटी रुपये
- Lakhimpur Kheri : प्रियांका गांधी ‘अंतिम अरदास’मध्ये होणार सहभागी, व्यासपीठावर येऊ देणार नसल्याचे बीकेयूकडून स्पष्ट
- मोठ्या दहशतवादी नेटवर्कचा खुलासा, दिल्ली-एनसीआर, यूपी, जम्मू आणि काश्मीरमधील 18 ठिकाणी NIAचे एकाच वेळी छापे