• Download App
    दिल्ली काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अनिल चौधरी यांना शेतकरी आंदोलकांनी परत पाठवले!! |Delhi Congress state president Anil Chaudhary sent back by farmers' agitators

    दिल्ली काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अनिल चौधरी यांना शेतकरी आंदोलकांनी परत पाठवले!!

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : शेतकऱ्यांच्या भारत बंदला पाठिंबा द्यायला आलेल्या दिल्ली काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अनिल चौधरी यांना शेतकरी आंदोलकांनी परत पाठविले. आमचे आंदोलन अराजकीय आहे. यात कोणत्याही राजकीय पक्षाचा समावेश नाही. आमचे व्यासपीठ राजकीय पक्षांसाठी नाही, असे आंदोलकांनी अनिल चौधरी यांना स्पष्टपणे बजावले.Delhi Congress state president Anil Chaudhary sent back by farmers’ agitators

    अनिल चौधरी हे आज काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह गाजीपुर बॉर्डरवर शेतकरी आंदोलकांबरोबर निदर्शने करण्यासाठी गेले होते. परंतु तेथे आधीच असलेल्या आंदोलकांनी त्यांना मूळ शेतकरी आंदोलनाच्या ठिकाणापासून लांब जाऊन निदर्शने करायला सांगितले. तसेच त्यांच्या निदर्शनांमध्ये शेतकऱ्यांनी सहभागी व्हायला देखील नकार दिला. आमचे आंदोलन राजकीय आहे. त्यामुळे आपण इथून लांब जावे, असे आंदोलकांनी त्यांना सांगितले.



    या संदर्भातला व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर अनिल चौधरी यांनी देखील काँग्रेसला तिथे होत असलेल्या विरोध पाहून काढता पाय घेतला. शेतकऱ्यांची मागणी आम्हाला मान्य आहे. केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घेतले पाहिजेत. ही आमची ही मागणी आहे. शेतकऱ्यांच्या भावना समजून घेण्यासाठी मी इथे आलो होतो. परंतु त्यांनी त्यांचे आंदोलन राजकीय नसल्याचे सांगितल्याने मी इथून जात आहे, अशी मखलाशी अनिल चौधरी यांनी नंतर केली.

    एकीकडे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी महाराष्ट्रात भारत बंदला काँग्रेसचा पाठिंबा असल्याचे जाहीर केले, तर दुसरीकडे दिल्ली प्रदेशाध्यक्ष अनिल चौधरी यांना मात्र शेतकऱ्यांनी आंदोलन स्थानापासून दूर जायला सांगितले. त्यामुळे शेतकरी आंदोलनातली राजकीय विसरण्याची बाहेर आली आहे.

    Delhi Congress state president Anil Chaudhary sent back by farmers’ agitators

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    हेमंत सोरेन यांना पुन्हा धक्का! ED कोर्टाने फेटाळला अंतरिम जामीन

    उज्ज्वल निकमांना उमेदवारी; म्हणे, पूनम महाजनांचा पत्ता कट; पण हा तर खरा त्या पलीकडचा “मास्टर स्ट्रोक”!!

    ‘ममता बॅनर्जींना अटक करा, अन् ‘TMC’ला दहशतवादी संघटना घोषित करा’